dhule rto 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात यंदा "आरटीओ'च्या उत्पन्नात घट 

विजय शिंदे

धुळे : शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी, महागाई व बेरोजगारीमुळे दुचाकीसह तीन व चारचाकी वाहनांच्या विक्रीची उलाढाल काहीशी मंदावली. येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) गेल्या दहा महिन्यांत सात हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी झाली. त्यातून केवळ सुमारे 54 कोटींहून अधिक रक्कम करस्वरूपात प्राप्त झाली. मात्र यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी दुष्काळसदृश स्थिती असतानाही 63 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले होते. 

राज्यासह जिल्ह्यात दिवसागणिक वाहनांचा विक्रीत वाढ होत असून, असंख्य वाहनांची रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. याशिवाय ट्रॅक्‍टर, कार, ऑटोरिक्षा, अवजड वाहनांतही वाढ होत आहे. मात्र सर्वसामान्यांची आवाक्‍यात असलेली मोटारसायकल खरेदी अतिवृष्टी, वाढत्या महागाईमुळे काहीशी मंदावली. केवळ जिल्ह्यात आर्थिक वर्षामधील 1 एप्रिल 2019 ते 31 जानेवारी 2020 दहा महिन्यांचा कालावधीत दुचाकीसह व चारचाकी वाहनांची विक्रीतून उलाढाल पाहावयास मिळाली. यात विविध कंपनीच्या 6 हजार 588 मोटारसायकली, तर 728 तीन व चारचाकी वाहनांची विक्री झाली. या सर्व वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन विभागात झाली असून, यातून शासनाला करस्वरूपात 54 कोटी 52 लाख 99 हजार 254 रुपयांचा महसूल मिळाला आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान दुष्काळस्थिती असतानाही 63 कोटी 25 लाख 30 हजार 586 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा तुलनेत गेल्या वर्षाचा आकडा तब्बल नऊ कोटीपेक्षा जास्त होता. 


चॉइस नंबरवर कोटीचे उत्पन्न 
शहरासह जिल्ह्यात वाहनधारकांनी वाहन खरेदीनंतर वाहन नंबरावरही शासनाला मोठी रक्‍कम चुकविली आहे. यात कार, मोटारसायकल, ट्रॅक्‍टर,ऑटोरिक्षा यासह आदी वाहनांचा लक्षवेधी नंबर मिळविण्यासाठी जन्मतारीख, तसेच ओम, दादा, मामा, भाऊ या नावाशी सुसंगत असलेल्या नंबरावर वाहनधारकांकडून तब्बल एक कोटी 94 लाख 6 हजारांचा महसूल शासनाला मिळाला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT