उत्तर महाराष्ट्र

अरेच्चा सोनगीरला चक्क डोंगरच काढला विक्रीला ?  

एल. बी. चौधरी

सोनगीर ः आजूबाजूला डोंगर मागे भव्य सुवर्णगिरी किल्ला, टेकड्यांमधून वाट काढत जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग व लगतच सोनगीर गाव. कोणत्याही मार्गाने आले तरी प्रत्यक्षात गावाच्या सीमेवर पोहचल्याखेरीज न दिसणारे जणू एखादे हिल स्टेशन वाटणारे सोनगीर. मात्र यातील एखादे डोंगरच नष्ट झाले तर अवघ्या गावाचे सौंदर्य लयास जाण्याची भिती आहे. आणि सध्या हीच भिती ग्रामस्थांना वाटत असून धुळ्याकडून गावात येतांना प्रवाशांना जणू काही वाकून नमस्कार करीत स्वागत करणारा पहिलाच सबरगड नावाचा डोंगर विक्री होऊन तोडला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आणि हाच विषय चौकाचौकात चर्चिला जात आहे.

एका रात्रीत सबरगडाशेजारी लाल रंगाच्या सिमेंटच्या विशिष्ट खुणा गाडल्या गेल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सोनगीर हे गाव पुरातन डोंगर व किल्ल्यांचे चेगाव म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. मात्र मुंबई आग्रा महामार्गाला लागून व पोलीस ठाण्याच्या समोर असलेला सबरगड डोंगराच्या आजूबाजूला खुणा लावण्यात आल्याने डोंगर विकला गेल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत अनेकांनी मोबाईलवरून विचारणा केली. यावर शहनिशा करण्यासाठी अनेक अधिकारी, गावतील पदाधिकाऱयांना विचारले.

कोणाला काहीच माहिती नाही

डोगर विक्रीला या चर्चेबाबत ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांना विचारले असता मला काहीच माहिती नाही असे सांगितले. तलाठी जितेंद्र चव्हाण यांनी सबरगडाशेजारील जागा सुलतानशहा फकीर यांच्या नावाची 10. 89 हेक्टर जमीन निघाल्याचे जुने दस्ताऐवज निघाल्याचे व या जागेवर त्यांनी दावा केल्याचे सांगितले. मात्र डोंगर विक्री बाबत कानावर पडले असून अद्याप तशा व्यवहाराचे कागदपत्रे हाती आले नसल्याचे सांगितले. मंडळ अधिकारी राजपूत यांनी सांगितले की डोंगर विकता येत नाही आणि कोणी विकू किंवा घेऊ शकत नसल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी यांनी हा डोंगर धुळ्यातील काहींनी घेतला असल्याचे ऐकले आहे असे सांगितले. जिल्हा परिषद सदस्या वैशाली चौधरी यांचे पती ज्ञानेश्वर चौधरी यांनीही डोंगर विक्री झाल्याचे फक्त ऐकले मात्र खरे खोटे माहित नसल्याचे सांगितले. तहसीलदार किशोर कदम यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगून माझी बदली झाल्याने मी चार्ज सोडल्याचे सांगितले.

साडेतीन कोटीला टेकडी विकली ?

मात्र ग्रामस्थांमध्ये टेकडी साडेतीन कोटी रुपयाला विकली गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान अवैध रित्या डोंगर फोडून मुरूम विकण्याचा व्यवसाय येथे व परिसरात मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच टेकड्यांचा पाया खोदून धोकेदायक स्थिती निर्माण झाली आहे. असाच मुरूम विक्रीसाठी डोंगर विकला जात असल्याचे चित्र आहे. 

सबरगडाभोवती या खूणा कशाचा?

एखादा नैसर्गिक डोंगर कोणाच्या मालकीचा असू शकतो का? तो विकण्याचा कोणाला अधिकार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान, श्रीलंका ते अमेरिका... जगभरातील लोक भारताकडे कसं बघतात? सर्वात मोठा सर्व्हे समोर

लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा! ध्वजारोहणापासून भाषणापर्यंत... १५ ऑगस्टला काय-काय घडणार? वाचा मिनिट-टू-मिनिट वेळापत्रक

R. Ashwin: अश्विन क्रिकेटवर बोलत होता अन् अचानक घराबाहेर पोलीस आले; फोन उचलताच समोर आलं ‘ते’ कारण...

Success Story: 1.5 लाखांची नोकरी सोडली; देशी कोंबड्यांच्या व्यवसायातून आता वर्षाला 36 लाखांचा नफा!

Marathi News Live Updates : टीएमसीच्या माजी आमदारावर जमावाचा संताप; कोर्टात नेत असताना फेकली अंडी

SCROLL FOR NEXT