traffic police 
उत्तर महाराष्ट्र

वाहतूक नियमांच्या उल्लंघनात तीन हजाराने वाढ 

विजय शिंदे

धुळे : शहरासह जिल्ह्यात वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 25 हजार वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने वर्षभरात दंडात्मक कारवाई केली. यातून पोलिस विभागाला 50 लाखांचा महसूल प्राप्त झाला. तसेच गेल्या वर्षाच्या तुलनेत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या तीन हजारापेक्षा अधिक असल्याचे वाहतूक शाखेने सांगितले. एकीकडे वाहतूक सुरक्षा सप्ताहाचा गाजावाजा केला जात असताना ही आकडेवारी चिंताजनक ठरत आहे. 

वाहनावर मोबाईलव्दारे बिनधास्त संभाषण करणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, भरधाव वेग, रेड सिग्नल जम्पिंग, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, ट्रिपल सीट, अवैध प्रवासी वाहतूक, फॅन्सी नंबर प्लेट, विना विमा वाहन चालविणे, विना सीटबेल्ट वाहन चालविणे यासह वाहतुकीचे विविध नियम मोडीत काढणाऱ्या 25 हजार 658 वाहनचालकांवर विविध कलमान्वये शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली. यात 2018 मध्ये 22 हजार 222 वाहनचालकांवर कारवाई झाली होती. तुलनेत 2019 मध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या तब्बल तीन हजाराने वाढली आहे. शाखेकडून ई- चलनाच्या माध्यमातूनही दंडाची आकारणी होते. 

कर्मचाऱ्यांची उणीव 
शहर वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षकासह सहायक निरीक्षक व कर्मचारी मिळून 82 पदे मंजूर आहेत. मात्र, पुरेसे मनुष्यबळ नसल्याने पोलिस प्रशासनाने प्रत्यक्षात 40 कर्मचाऱ्यांसह अधिकारी वाहतूक नियोजनासाठी दिले आहेत. पैकी शहरात 23, तर उर्वरित तालुक्‍याच्या ठिकाणी असतात. अपूर्ण मनुष्यबळामुळे वाहतुकीचे विविध प्रश्‍न जटिल होतात. 


कारवाईचा इशारा 
रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दिलेल्या निर्देशानुसार वाहनचालकांनी वाहनाचा विमा काढणे अनिवार्य आहे. विमा नसल्यास शहर वाहतूक शाखेला कारवाईचे अधिकार प्रदान आहेत. शहरासह जिल्ह्यातील वाहनधारकांनी वेळोवेळी विमा काढावा, अन्यथा कारवाईचा इशारा आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT