crime 
उत्तर महाराष्ट्र

धुळेः पुन्हा अज्ञाताने फेकले विषारी रसायन..

Dhule Crime News: रात्री अपरात्री हे विषारी रसायन उतरविल्याचा अंदाज आहे. म्हणूनचं हा गैरप्रकार याठिकाणी वारंवार घडत आहे.

सुरज खलाने

नेर ः नेर (ता. धुळे) येथून जवळच असलेल्या सुरत नागपुर महामार्गालगत (Surat Nagpur Highway) नवे भदाणे गावालगत नाल्यात पुन्हा माथेफिरू ट्रकचालकाने विषारी रसायन टाकले आहे. त्यामुळे नेर आणि भदाणे येथील पाणीपुरवठा दूषित होऊन नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ट्रकचालकाने महामार्गारील नवे भदाणे गावाजवळील नाल्यात रसायन (Chemistry) टाकले होते. त्यामुळे नेर आणि नवे भदाणे गावाचा पाणीपुरवठा दूषित होऊन पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पाण्याचे नमुने जिल्हा प्रयोग शाळेत पाठवल्यावर पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.

आता पुन्हा ट्रक चालकाने विषारी रसायन टाकल्याने ते नदीत जाऊन पुन्हा जलचर प्राण्यांचीही जीवितहानी होत आहे. विहिरींचाही पाणीपुरवठा पुन्हा दूषित होणार आहे. त्यामुळे असा प्रकार कोणता ट्रक चालक करीत आहे त्याचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागे झालेल्या या गैरप्रकाराची माहिती तहसील कार्यालयात तसेच पाटबंधारे कार्यालयाला दिलेली होती.त्यांच्याशी संपर्क केला असता त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आम्ही झालेल्या घटनेच्या ठिकाणी लवकरच येत आहोत.


परंतु त्याठिकाणी आजपावेतो एकही अधिकारी,कर्मचारी पाठविण्यात आलेले नाहीत.याविषयी कोणत्याही प्रकारे दक्षता घेण्यात आलेली नाही. यामुळे येथील ग्रामस्थांनी मोठा रोष व्यक्त केला आहे. तसेच याठिकाणी रात्री अपरात्री हे विषारी रसायन उतरविल्याचा अंदाज आहे. म्हणूनचं हा गैरप्रकार याठिकाणी वारंवार घडत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आहे.


गवत आणि झाडे जळाली ट्रक चालकाने जिथे विषारी रसायन टाकले आहे.त्याठिकाणी गवत जळाले आहे. तसेच काही झाडेही सुकली आहेत.यावरुन हे रसायन अत्यंत विषारी आहे हे स्पष्ट होते.त्यामुळे याचा शोध घेण्यात यावा अशी मागणी भदाणेचे माजी सरपंच कृष्णा खताळ,गोकुळ मारनर,अजय सरगर,भटु श्रीराम,विजय श्रीराम यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT