watter watter
उत्तर महाराष्ट्र

विजेअभावी धुळ्याचा पाणीपुरवठा विस्कळित; खापर महावितरण कंपनीवर

एक्स्प्रेस फिडरच्या सुविधेमुळे वीज कंपनीला पाणीपुरवठ्यापोटी दरमहा सुमारे सरासरी एक कोटी रुपयांचे बिल दिले जाते.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी योजनेवरील बाभळे (ता. शिंदखेडा) केंद्रात तांत्रिक बिघाडामुळे सकाळी साडेसहाला वीजपुरवठा बंद होता. तो चार ते पाच तासांनंतर पूर्ववत झाला. त्यावेळी सुखवद पाणीपुरवठा केंद्रात वीजपुरवठा डीपी बदलण्यासाठी बंद होता. तो दुपारी चारला सुरू झाला. त्यामुळे नऊ तास विजेअभावी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

धुळे शहरातील सरासरी ६० ते ७० टक्के पाणीपुरवठा तापी योजनेवरून होतो. पुरवठा आठ ते दहा दिवसांनंतर होत असल्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. त्यावर स्थायी समिती सभापती संजय जाधव यांनी नियोजनावर लक्ष केंद्रित केले व यंत्रणेला उपाययोजनांचा आदेश दिला. विलंबाने होणारा पाणीपुरवठा नियंत्रित करून शहरात सरासरी चार ते पाच दिवसाला तो होत आहे. मात्र, सुखवद व बाभळे केंद्रावर शुक्रवारी नऊ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला.

एक्स्प्रेस फिडरच्या सुविधेमुळे वीज कंपनीला पाणीपुरवठ्यापोटी दरमहा सुमारे सरासरी एक कोटी रुपयांचे बिल दिले जाते. एक्स्प्रेस फिडरव्दारे विजपुरवठा अखंडित सुरू ठेवणे कंपनीला बंधनकारक आहे. यात तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी फिडरवरून कंपनीने वीजपुरवठा सुरू करणे गरजेचे आहे. याप्रश्‍नी महापालिकेने वेळोवेळी वरिष्ठस्तरावर पत्र व्यवहार केला. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. तरीही सदोष वीजपुरवठ्याच्या कारणाने शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते. नागरिकांच्या तक्रारी वाढतात. ते लक्षात घेत महावितरण कंपनीने महापालिकेस आवश्यक ते सहकार्य करावे. अन्यथा, नागरिकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागते, असे प्रशासनाने म्हटले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला धक्का? महावितरणकडून स्मार्ट मीटरसाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, वाद पेटला

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT