dipnagar wife strike 
उत्तर महाराष्ट्र

पतीचा मृतदेह घेऊन पत्नीचा न्यायासाठी लढा ! 

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : दीपनगर प्रकल्पातील कॅंण्टीनमध्ये चहा घेण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यास सुरक्षा रक्षकांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली घडली असून पतीचा मृतदेह घेवून पत्नीसह नातेवाइकांनी दीपनगर प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. जोपर्यंत न्याय मिळत नाही; तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भुमिका घेतली आहे. 

फेकरी (ता. भुसावळ) येथील रहिवासी प्रवीण नामदेव बऱ्हाटे यांच्या मुलीचे आज (ता. 4) लग्न होते. यासाठी रात्रीच स्वयंपाकाची तयारी सुरु होती. स्वयंपाकासाठी आलेले हलवाई व इतर मजूरांसाठी रात्री साडेदहाच्या सुमारास चहा घेण्यासाठी संजय बळीरात बऱ्हाटे (वय 46, रा. फेकरी ता. भुसावळ) हे दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या कॅण्टीनमध्ये जात होते. यावेळेस त्यांना गेट क्रमांक 210 जवळ उभे असलेल्या खासगी सुरक्षा रक्षक कर्मचारी सागर मोरे, योगेश (नाव पूर्ण समजू शकले नाही), राजेश बनसोडे यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर संजय बऱ्हाटे यांना तिघांनी बेदम मारहाण केली. तर कायमस्वरूपी नियुक्त असलेल्या सुरक्षा अधिकारी लोकरे यांनीही शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यात संजय बऱ्हाटे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर तिघे खासगी सुरक्षा रक्षक फरार झाले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने भुसावळातील खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषीत केले. 

चार तास केला ठिय्या 
सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मारहाणी संजय बऱ्हाटे यांचा मृत्यू झाला. यामुळे पत्नीने नातेवाईकांसह पतीचा मृत्यदेह घेवून दीपनगर औष्णीक विद्युत केंद्र गाठले. प्रवेशद्वाराजवळ पतीचा मृतदेह ठेवून न्यायासाठी याचना केली. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भुमिका पत्नी आणि त्यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year: पार्टी ऑल नाईट! महाराष्ट्रात हॉटेल्स-पब पहाटे ५ वाजेपर्यंत खुले राहणार; फक्त एकच अट, पण कोणती?

Confirm Ticket : रेल्वेने बदलला मोठा नियम! कन्फर्म सीट हवी असल्यास आत्ताच करून घ्या 'हे' एक काम..नाहीतर 30 जानेवारीनंतर बसेल फटका

Omraje Nimbalkar यांच्यावर आमदार पुत्राची जहरी टीका, 'शेंबड पोरं' म्हणत पुन्हा डिवचलं | Malhar Patil | Sakal News

थर्टी फर्स्टला हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर, मुंबई-पुण्यात वाहतुकीत बदल; कोणता रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Pachod News : कुटुंब नियोजनातही पुरुषांची मक्तेदारी; जबाबदारी मात्र महिलांवरच!

SCROLL FOR NEXT