live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

फुटपाथवरील निराधारांची दिवाळी झाली "गोड'! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः पिंप्राळा उपनगरातील संजीवनीनगरातील रहिवासी असलेले प्राथमिक शिक्षक कुणाल पवार यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी रेल्वेस्थानक, बसस्थानक, जिल्हा रुग्णालय, मंदिराबाहेरील व फुटपाथवरील 50 निराधार, गरीब व गरजूंना दिवाळीनिमित्त फराळ व खाऊचे वाटप करत त्यांची दिवाळी गोड केली. गोरगरीब व निराधारांची दिवाळी गोड करण्याचा शिक्षक पवार यांनी संकल्प केला असून, त्यांच्या संकल्पाचे यंदा दुसरे वर्ष आहे. 

दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट, फराळाचा आस्वाद, नवनवीन कपडे खरेदी, फटाक्‍यांची आतषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले, तरी निराधार व गोरगरिबांसाठी कसली आली दिवाळी? त्यांना तर दिवाळी काय आहे, हेदेखील माहीत नसते. असे विदारक चित्र समाजात आपल्याला दिसत असते. समाजातील अशा उपेक्षित घटकांची दिवाळी गोड व्हावी, त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद घेता यावा म्हणून शिक्षक पवार यांनी चिवडा, पापडी, शंकरपाळे, फिकी शेव, तिखट शेव व सोनपापडी असलेल्या 50 पाकिटांचे वाटप केले. 

गतवर्षीही शिक्षक पवार यांनी निराधार, गरीब गरजूंना फराळ व खाऊचे वाटप केले होते. शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे प्रयोगशील, कृतिशील, उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून श्री. पवार यांची ओळख आहे, हे आजवरच्या अनेक शैक्षणिक व समाजापयोगी नवनवीन उपक्रमांनी त्यांनी दाखवून दिले आहे. शिक्षक पवार यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
 
दिवाळीचा आनंद निराधार, गोरगरीब व गरजूंना घेता यावा, या सामाजिक बांधिलकीतून दरवर्षी फराळ व खाऊवाटपाचा संकल्प गतवर्षी केला होता. त्याप्रमाणे दरवर्षी हा छोटासा उपक्रम राबवून माझ्या परीने शक्‍य ती मदत करीत आहे. अशा सामाजिक चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन सामाजिक ऋण फेडले पाहिजे. 
- कुणाल पवार, प्राथमिक शिक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT