sand traktar.
sand traktar. 
उत्तर महाराष्ट्र

तहसीलचे कुलूप तोडून चोरलेले ट्रॅक्‍टर मोहाडीत 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर कारवाई करुन हे ट्रॅक्‍टर दंड वसुलीसाठी तहसील कार्यालयात कुलूपबंद गेट मध्ये उभे केले होते. ट्रॅक्‍टर परस्पर पळवून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली याप्रकरणी शहर पोलीसत गुन्हाही दाखल आहे. पोलिस अद्याप या ट्रॅक्‍टरचा शोध लावू शकले नसले तरी, हे ट्रॅक्‍टर मोहाडी शिवारात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. 


अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरबाबबत तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने 4 एप्रिल रोजी मोहाडी शिवारातून चालक रुपचंद गुलचंद साळुंखे (वय 33 रा. मोहाडी) याच्या ताब्यातील ट्रॅक्‍टर (क्र. एम.एच-19 सी 3277) हे ट्रॅक्‍टर जप्त केल होते. जप्त ट्रॅक्‍टर बळीराम पेठेतील तहसील कार्यालय आवारात उभे करण्यात आले होते. संध्याकाळी कार्यालय बंद झाल्यावर लोखंडी मुख्य प्रवेशद्वाराला कूलूप लावण्यात आले असतांना ते कुलूप तोडून ट्रॅक्‍टर पळवण्यात आले होते. या प्रकरणी मंडळ अधिकारी रविंद्र उगले यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात ट्रॅक्‍टर मालक सतिष संजय उर्फ ईश्‍वर कोळी (सोनवणे) रा. मोहाडी याच्या विरुद्ध गुन्हाह ीदाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक सुनील पाटिल करीत होते. गुन्हा दाखल होवून चोविस तास उलटत नाही तोवर चोरीला गेलेले ट्रॅक्‍टर मोहाडी येथे असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तपासाला सुरवात करण्या अगोदरच ट्रॅक्‍टरचा ठाव ठिकाणा लागला असून एका राजकिय पुढाऱ्याच्या आश्रयात ट्रॅक्‍टर असल्याचे समोर आले आहे. 


मालकानेच े ट्रॅक्‍टर चोरले. 
मंगळवार (ता.7 )एप्रिलपर्यंत हे ट्रॅक्‍टर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे होते. दिवस उजाडण्या पुर्वीच चोरट्यांनी गेटचे कुलूप तोउून ट्रॅक्‍टर लंपास केले होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT