jalgaon airport Trujet 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव विमानतळावर नाईट लॅंडींगला मंजूरी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव विमानतळावर विमानांचे "नाईट लॅंडींग'व्हावे यासाठी गेले अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते. त्याला केंद्रीय विमानतळ प्राधीकरणाने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे पत्रही प्राप्त झाले असल्याची माहिती आमदार गिरीश महाजन यांनी दिली. खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांनी दिल्लीत विशेष पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


जळगाव विमानतळावरून चोवीस तास विमान सेवा सुरू व्हावी यासाठी "नाईट लॅंडींग'परवानगी देण्यात यावी यासाठी केंद्र शासनाच्या अख्यातरीत असलेल्या विमानतळ प्राधीकरणाकडे मागणी करण्यात येत होती. त्याला यश आले असल्याची माहिती आमदार महाजन यांनी दिली. ते म्हणाले, जिल्ह्याचे खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे यांनी दिल्लीत केंद्राशासनाकडे पाठपुरावा केला होता. केंद्रीय विमानउड्डयन मंत्री यांचीही त्यांनी भेट घेतली होती. या शिवाय आपणही त्याबाबत वेळोवेळी दिल्लीत त्याचा पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. 

मंजूरीचे पत्र प्राप्त 
विमानतळ प्राधीकरणाने आता मंजुरी दिलेली आहे. याबाबतचे पत्र आज प्राप्त झाले आहे. देशभरातील 28 विमानतळात जळगाव विमानतळालाच "नाईट लॅंडीग'ची परवानी मिळाली आहे, शिर्डी विमानतळाला दिवसाची परवानगी मिळालीा आहे. असेही आमदार महाजन यांनी सांगितले. 

विमानसेवा आता 24तास 
जळगाव विमानतळावर आता रात्रीही विमाने थांबू शकणार असल्याने जळगावातून आता चोवीस तास विमानसेवा उपलब्ध होणार असल्याचे आमदार महाजन यांनी सांगितले. लवकरच जळगाव येथून पुणे येथेही विमानसेवा सुरू होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT