corona positive 
उत्तर महाराष्ट्र

जळगावात आणखी चार पॉझिटीव्ह रूग्ण 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः कोरोना पॉझिटीव्हच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून जिल्ह्याचा आकडा देखील रोज वाढत आहे. यात आज प्राप्त अहवालात चार रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रूग्णांचा आकडा आता 41 वर पोहचला आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरातील संख्या देखील आता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील अमळनेरमध्ये सर्वाधिक रूग्ण असून यात आणखी दोन जणांची भर पडली आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ ही जिल्ह्यातील नागरीकांसह प्रशासनाची देखील झोप उडविणारी आहे. वाढत्या आकड्यामुळे जिल्हा रेडझोनमध्ये केव्हाच पोहचला असल्याने हळूहळूु पन्नाशीकडे वाटचाल सुरू आहे. 

चार रूग्ण पॉझिटील 
कोरोना व्हॉस्पिटलला अर्थात शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडून संशयीत रूग्णांचे पाठविलेल्या नमुन्यांचे अहवाल आज रात्री धुळे येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले. यात एकूण चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून, यात पाचोरा येथील दोन, अमळनेर येथील एक व जळगाव शहरातील जोशी पेठ परिसरातील एका रूग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा आता 41 वर पोहचला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अवकाळीच्या ढगानं घात केला, अजितदादांच्या विमानाचा अपघात कमी दृश्यमानतेमुळं, नेमकं काय घडलं?

Blood Pressure Control: फक्त मीठ कमी केल्यानं बीपी कंट्रोल होतो का? डॉक्टरांनी सांगितलेलं धक्कादायक सत्य

Latest Marathi News Live Update : दादा गेले! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अश्रू अनावर

Gold Price Today : अमेरिकन फेडच्या निर्णयापूर्वी सोनं-चांदी चमकले! सोनं ३,२०० रुपयांनी महागलं, जाणून घ्या आजचा ताजा भाव

Ajit Pawar Death: महाराष्ट्र सुन्न! विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन, राज्यावर शोककळा

SCROLL FOR NEXT