live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

टाकरखेडा येथे अतिसाराची लागण; शंभरहून अधिक जणांना त्रास 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः टाकरखेडा (ता. एरंडोल) येथे दूषित पाण्याचा पुरवठा झाल्याने गावात अतिसाराची लागण झाली आहे. यामुळे गावातील साधारण शंभर महिला व पुरुषांना अतिसाराचा त्रास जाणवू लागला असून, सर्वांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
साधारण दीड हजार लोकवस्ती असलेल्या टाकरखेडा गावात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली. त्यामुळे दूषित पाणी जलवाहिनीद्वारे घरात साठविण्यात आले. हेच दूषित पाणी नागरिकांच्या पिण्यात आले. दोन दिवसांपासून गावात दूषित पाणीपुरवठा होत असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हेच पाणी पिण्यात आल्याने अनेकांना याचा त्रास आज जाणवू लागला. अनेकांना उलट्या व जुलाबचा त्रास जाणवू लागला होता. साधारणपणे गावातील शंभर जणांचा हा त्रास जाणवू लागला. यानंतर काही जणांना जिल्हा रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
 
"कॅम्प'द्वारे रुग्णांवर उपचार 
गावात अतिसाराची लागण झाल्याची माहिती सरपंचांनी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना कळविली. यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पथकासह गावात दाखल होऊन "कॅम्प' लावत उपचार उपलब्ध करून दिले. मात्र, यात काही जणांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य विभागाकडून येथे नऊ दिवसांसाठी कॅम्प लावण्यात आला असून, याद्वारे लागलीच उपचार मिळाल्याने अतिसाराची साथ आटोक्‍यात आल्याचे जिल्हा परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT