boy death
boy death 
उत्तर महाराष्ट्र

मुलाच्या मृतदेहाजवळ सहा तास ती आक्रोश बसली अन्‌ पोलिस राहिले हद्दीच्या वादात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील खंडेरावनगरातील सव्वीस वर्षीय तरुणाची रेल्वेचा धक्का लागल्याने मृत्यु झाल्याचा घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मुलगा शौचास गेल्यानंतर बराच वेळ परतला नाही म्हणुन आई दारातच बसुन त्याची वाट बघत राहिली. सकाळी साडेआठ वाजता मृतदेह आढळून आल्यावर परिसरातील रहिवाश्‍यांनी धाव घेतली. ओळख पटवल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. जिवनाचा एकमेव आधारही हिरावल्याने वयोवृद्ध आईचा सलग अक्रोश सुरु होता. पोलिसांना कळवुनही हद्दिच्या वादात पोलिस साडेसहा तास उशिरा आल्यावर दुपारी 2:40ला मृतदेहा जवळ पोलीस पोचले. 

हरिविठ्ठलनगरातील रहिवासी गजानन दलपत पाटील (वय-26) हा तरुण हातमजुरी करुन त्याचा व आई रुख्मीणीबाईचा उदनिर्वाह चालत होता. गेल्यावर्षीच वडीलाचे अकाली निधन झाल्याने घरात दोन्ही माय-लेक एव्हडाच परिवार असल्याने दोन वेळच्या जेवणा पुरते दिवसभर मिळेल ते काम करायचे आणि जगायचे अशा चौकटी तो जगत होता. काल रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शौचास जातो म्हणुन आईला सांगून गजानन घरा समोरच रेल्वेरुळाच्या बाजुला गेला होता. रात्री घरी परतला नाही म्हणुन आई वाट पाहत होती. सकाळी रेल्वेरुळा जवळ मृतदेह पडल्याचे परिसरातील रहिवाश्‍याना आढळून आल्याने नागरीकांनी धाव घेतली. मृतदेह गजाननचा असल्याचे ओळख पटल्यावर पोलिसांन घटना कळवण्यात आली. मृतदेहाचा पंचनामा करुन त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामानंदनगर पोलिसांत या प्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

साडेसहा तास मृतदेह पडून 
सकाळी आठ साडेआठ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठल नगरातील रहिवाश्‍यांना रेल्वेरुळावर गजाननचा मृतदेह आढळून आला. ओळख पटल्यावर त्यांनी रेल्वे पोलिसांना घटना कळवली. रेल्वे पोलिसांनी (खांबा नंबर.415 ते 426) अप रेल्वेरुळ रामानंदनगर पोलिसांच्या हद्दीत असल्याने रामानंदनगर पोलिसांना घटना कळवून त्या बाबतचा मेमो पाठवतो असे सांगीतले. मात्र, दुपारी 2:40 वाजे पर्यंत रामानंदनगर पोलिस घटनास्थळी पोचलेच नाही. वारंवार पोलिसांना फोन करुनही पोलिस येत नाही म्हणुन नागरीकांनी संताप व्यक्त केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT