bullet train
bullet train 
उत्तर महाराष्ट्र

"बुलेट ट्रेन"मधून जाण्याचे जळगावकरांचे स्वप्न होणार पूर्ण  

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्हा कापूस, अस्सल सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे जळगावला राज्यासह परराज्यातील नागरिकही येतात. जिल्ह्यात महामार्गाचे रस्ते प्रशस्त (चौपदरी)असावेत, डे-नाईट विमानसेवा असावी, 
बुलेट ट्रेनचे वेड सर्वांनाच लावलेल्या बुलेट ट्रेनचा प्रवास जळगाव जिल्ह्यातून व्हावा. असे जळगावकरांना नक्कीच वाटत असणार. रस्त्याचे चौपदरीकरण, विमान सेवेची कामे प्रगतिपथावर आहेत. बुलेट ट्रेनचे जळगावमधून नेण्याचे स्वप्न अर्थमंत्री निर्मला सीमारमण यांनी काल अंदाजपत्रकात घोषणा करून पूर्ण केले आहे. आता जळगावला बुलेट ट्रेनला थांबा मिळवून देण्यासाठी दोन्ही खासदारांचा कस लागणार आहे. 

तीन ठिकाणी थांबा 
केंद्रीय अंदाज पत्रकात काल मध्य रेल्वेच्या मुंबई ते नागपूर दरम्यान हायस्पीड "बुलेट ट्रेन' नेण्याची घोषणा आहे. ही गाडी भुसावळ विभागातून 526.14 किलोमीटर अंतरात (कॉरिडॉर) धावेल. दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसनंतर भुसावळ विभागातून बुलेट ट्रेन धावेल. मुंबई -नाशिक-नागपूर या 753 किमी अंतरात ही गाडी धावेल. 

सहा मार्गावर धावणार बुलेट ट्रेन 
अंदाजपत्रकात बुलेट ट्रेनसाठी नवीन सहा मार्ग निश्‍चित करण्यात आला. त्यात दिल्ली चंदीगड-लुधियाना- जालंदर-अमृतसर, दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद, दिल्ली नोएडा-आगरा-लखनऊ-वाराणसी, मुंबई-पुणे-हैदराबाद, चेन्नई-बेंगलुरू-म्हैसूर, मुंबई-नाशिक- नागपूर या सहा मार्गावर नवीन बुलेट ट्रेनची निश्‍चिती करण्यात आली आहे. 

"बुलेट'ला थांब्यासाठी प्रयत्न व्हावेत 
भुसावळ विभागातून जाणारी मुंबई-हजरत निजामूद्दीन राजधानी एक्‍स्प्रेस ही वेगवान गाडीला जळगावला थांबा आहे. त्या पाठोपाठ आता मुंबई -नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. या गाडीला भुसावळला थांबा आहे. मात्र जळगावला नाही. यामुळे जळगाव येथे बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी लोकप्रतिनिधींना प्रयत्न करावे लागतील. 

अंदाजपत्रकात सहा नवीन मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याची नियोजन आहे. भुसावळ विभागातून मुंबई नाशिक नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेनचे नियोजन आहे. "पिंकबुक' आल्यावर या गाडीच्या थांब्याबाबत अधिक माहिती देता येईल. 
विवेककुमार गुप्ता, भुसावळ रेल्वे विभागीय व्यवस्थापक. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT