उत्तर महाराष्ट्र

ढोल- ताशांचा गजरातही आले "प्रोफेशनल मॅनेजमेंट'! 

धनश्री बागूल

जळगाव : शहरातील स्वराज्य निर्माण सेना संचलित शिवगंध ढोल पथकाची तयारी पूर्ण झाली असून, अनंत चतुर्दशीसाठी पथक सज्ज झाले आहे. शहरातील पहिले शंभराहून अधिक महिला व पुरुष एकत्र असणारे हे ढोल पथक आहे. यात सुमारे दीडशे महिला व पुरुषांचा सहभाग आहे. दरम्यान, ढोल- ताशांच्या गजरातही वेगळेपण आले असून, आता पथकांनाही "प्रोफेशनल मॅनेजमेंट'ची जोड मिळाली आहे. 
गेल्या चार ते पाच वर्षांपासून हे पथक शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्यासमोर येत आहे. फक्‍त पुणे- मुंबईतील महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करीत नाहीत, तर जळगावातील महिलाही काम करून स्वत:ची आगळीवेगळी ओळख निर्माण करू शकतात, हा विश्‍वास ठेवून हे पथक उभे राहिले आहे. महाविद्यालय- नोकरी सांभाळून महिला, तरुणी व पुरुष गणेशोत्सवाच्या एक ते दीड महिना अगोदरपासून रोज सायंकाळी ढोलचा सराव करतात व वर्षभर विविध कार्यक्रम करतात. यात शिस्तबद्ध प्रामुख्याने बघायला मिळतो. 

आकर्षक "ड्रेसकोड' 
महिला व पुरुष हे सारखेच दिसावेत, आपल्या पथकाची ओळख आपल्या "ड्रेस'वरून व्हावी यासाठी पथकातर्फे "ड्रेसकोड' ठेवण्यात आला आहे. यात पिवळ्या अथवा पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट, त्यावर लाल अथवा ऑरेंज रंगाचे जॅकेट, निळी जीन्स, डोक्‍यावर लाल फेटा, हातात घुंगरू, तर महिलांच्या कपाळाला चंद्रकोर व नाकात नथनी, असा अस्सल मराठमोळा पोशाख ठेवण्यात आला आहे. यात सर्व सदस्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. 

लहानांपासून मोठ्यांचा समावेश 
ढोल पथकात 10 वर्षांपासून 55 वर्षांपर्यंतच्या महिला व पुरुषांचा सहभाग आहे. लहान असो वा मोठे; या हे सर्वजण तितक्‍याच उत्साहाने ढोल वाजवितात. हे शिकताना त्यांना कोणत्याही प्रकारचा थकवा अथवा कंटाळा येत नाही, जितक्‍या उत्साहाने तरुण ढोल वाजवितात, तितक्‍याच उत्साहाने आणि जोशाने महिला व पुरुषदेखील ढोल वाजवितात. 

ढोल- ताशांचे प्रकार 
दरवर्षी पथकातर्फे नवनवीन प्रकारचे ढोल शिकविले जातात. आतापर्यंत भवानी, नाशिक ढोल, पुणेरी ढोल, ताशा यांसह वक्रतुंड, कल्लोड, आरंभ, वीरगर्जना, शौर्य, शिवमुद्रा, इंद्रजिमी, भीमरूपी, राऊडी, पावरी आदी प्रकारच्या चाली शिकविल्या आहेत. कार्यक्रमात कोणत्याही एकच प्रकार ढोलचा वाजविला जात नसल्याने हे पथक उपस्थितांचे लक्ष वेधते. यामध्ये हलगी, झांज, घुंगरू व घंटागाडी यांचा समावेश करण्यात आला आहे. 

ज्यावेळी या पथकाची स्थापना केली होती, त्यावेळी वाटले नव्हते, की इतक्‍या मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष सहभागी होतील. मात्र, कोणतीही अपेक्षा न करता निःस्वार्थ आणि उत्साहाने ढोल वाजवतात व कार्यक्रम गाजवतात. यात शिस्तबद्धपणा कायम असतो 
- परेश शिनकर (व्यवस्थापक) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT