उत्तर महाराष्ट्र

जिल्हा बॅंक नोकर भरतीची वीस दिवसांत जाहिरात 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीला शासनाने मंजुरी दिली असून, बॅंकेतर्फे या भरतीसाठी "आयबीपीएस' कंपनीला मक्ता देऊन वीस दिवसांत भरतीची जाहिरात ऑनलाइन पद्धतीने प्रसिद्ध केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, अशी माहिती संचालक एकनाथराव खडसे यांनी दिली. 
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची सभा चेअरमन ऍड. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेतील निर्णयबाबत माहिती देताना एकनाथराव खडसे यांनी सांगितले, की बॅंकेत नोकर भरती करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील 225 लिपिक पदाच्या भरतीसाठी "आयबीपीएस' या कंपनीला मक्ता देण्यात आला आहे. बॅंक सर्व्हिसेस भरतीच्या आधारावरच या भरतीची प्रक्रिया राहणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येईल. यासाठी येत्या वीस दिवसांत ऑनलाइन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. 

सोने तारण कर्ज योजना 
बॅंकेतर्फे आता सोने तारण कर्ज योजना सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. आय.सी.आय.सी.आय. बॅंकेच्या माध्यमातून ही कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. बॅंकेतर्फे अशा प्रकारची योजना सभासदांसाठी प्रथमच राबविण्यात येत आहे. 

मागेल त्याला कर्ज 
शेती कर्जाबाबत खडसेंनी सांगितले, की शेती कर्जासाठी "मागेल त्याला कर्ज' देण्याचे बॅंकेचे धोरण आहे. थकबाकीदार नसलेल्या कोणत्याही सभासदाला तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. आतापर्यंत बॅंकेतर्फे 65 हजार सभासदांना 285 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

करारावरील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ 
बॅंकेत करारावर असलेल्या कर्मचाऱ्यांबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. या कर्मचाऱ्यांची मुदत जूनपर्यंतच होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. 

संचालकांची उपस्थितीबाबत अनास्था 
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात. मात्र, महिन्यातून एकदा होणाऱ्या बैठकीसही संचालकांची उपस्थिती देण्याबाबत अनास्था दिसून येत आहे. आजही बैठकीस मोजकेच संचालक हजर होते. बहुतांश संचालकांनी या बैठकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT