lalit kolhe 
उत्तर महाराष्ट्र

माजी महापौर ललीत कोल्हे चारदिवस पोलिस रिमांडवर 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणातील मुख्य संशयित माजी महापौर ललित कोल्हे यास गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दाखल गुन्ह्यातील पाच संशयीतांना यापुर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते, न्यायालयीन कोठडीत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर जामीन मिळावा यासाठी त्यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने नुकताच परवा फेटाळून लावला आहे. 

शहरातील व.वा.वाचनालया मागील गोरजाबाई जिमखाना येथे 16 जानेवारी 2020 रोजी रात्री 08.30 वाजता व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर ललित कोल्हे यांच्यासह पाच ते सात जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेत साहित्या हे गंभीर जखमी झाले होते. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल गुन्हयात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात माजी महापौर ललीत कोल्हे मात्र, घटना घडल्या पासून फरार होते. ललीत कोल्हे महिला कार्यकर्त्या सरीता माळी यांच्या रामानंदनगर परिसरातील घरी असल्याच्या गुप्त माहितीवरुन गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांनी रात्री छापा टाकून घरझडती घेतल्यानंतर घराच्या गच्चीवर ललीत कोल्हे मिळून आल्याने अटक करुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 

व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे कोठडी 
शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत असतांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ललीत कोल्हे याला न्यायालयात हजर करण्यात आले. कोल्हे याच्यावर यापूर्वीही पोलीसात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांनी 3 लाख 44 हजार 785 रुपये ही खंडणी म्हणून घेतलेली रक्कम हस्तगत करणे आहे. महागडी कार व गुन्ह्यावेळीचे रिव्हॉल्वर चाकू तसेच दांडके आदी वापरलेले हत्त्यार हस्तगत करणे बाकी आहे. असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे ऍड स्वाती निकम यांनी केला. युक्तीवादाअंती न्या. ए.एस. शेख यांनी कोल्हे यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

नेमका काय? वाद 
बांधकाम व्यवसायीक खुबचंद साहित्या आणि माजी महापौर ललीत कोल्हे दोघेही व्यवसायीक मित्र होते, मैत्री असतांना साहित्या यांची 29 लाखांची इंडीवर कार कोल्हे यांच्याकडेच असून कार परत मागीतल्यावरुन वादाला सुरवात झाली. खासगी आयुष्यावर एकमेकांवर टिप्पणी करण्यावरुन वाद विकोपाला जावून प्रकरण चिघळून 16 जानेवारीची घटना घडल्याचे सांगीतले जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT