उत्तर महाराष्ट्र

जळगाव मनपा शंभर गाळेधारकांना देणार नोटीस 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या गोलाणी संकुलात उपायुक्त अजित मुठे यांनी बुधवारी  सायंकाळी अचानक पहिल्या मजल्याची पाहणी केली. पाहणीदरम्यान दोन दुकानांचे एक दुकान तसेच अंतर्गत केलेले बदल हे विनापरवागी केल्याचे सुमारे शंभर गाळे आढळून आले. त्यानुसार महापालिका या गाळेधारकांना नोटिसा बजावणार आहे. 

महापालिकेच्या मालकीची शहरात 28 व्यापारी संकुले आहेत. त्यापैकी 20 संकुलांची मुदत संपली असून, गाळेधारकांचा अजून प्रश्‍न मिटलेला नाही. मुदत अजून बाकी असलेल्या संकुलामधील गोलाणी मार्केटमध्ये अनेक गाळेधारक परवानगी न घेता अंतर्गत बदल, बांधकाम होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार बुधवारी उपायुक्त मुठेंनी अचानक गोलाणी संकुलाच्या पहिल्या मजल्याच्या दुकानांची पाहणी केली. यात सुमारे शंभर दुकाने विनापरवानगी बदल केल्याची आढळून आली. यावेळी पाहणीदरम्यान किरकोळ वसुली विभागाचे प्रमुख नरेंद्र चौधरी, विधी विभागाचे किरण भोळे, अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच. एम. खान यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

एक-दोन ठिकाणी वाद 
दुकानांची पाहणी करत असताना एक दोन ठिकाणी गाळेधारकंनी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. कर्मचारी व अधिकऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती दिल्यानंतर गाळेधारक नरमले. 

दोन गाळ्यांचे एक दुकान 
"गोलाणी'त गाळ्यांच्या पाहणीत दोन दुकानांचे एक दुकान विनापरवागी केल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यात दुकानांमध्ये अंतर्गत केलेले बांधकाम, पार्टिशन, असे अनेक प्रकार या पाहणीतून आढळून आले आहे. 

81 "ब'नुसार बजावणार नोटिसा 
पाहणीदरम्यान विनापरवानगी बांधकाम केल्याचे आढळून आलेल्या गाळेधारकांना महापालिका 81 "ब'नुसार नोटिसा दिल्या जाणार आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन गाळेधारकांवर कोणत्या प्रकारची कारवाई करायची, हे ठरविणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT