उत्तर महाराष्ट्र

प्रिटिंग प्रेसची चाके थांबल्याने जीवनच 'लॉकडाउन' 

सकाळन्यूजनेटवर्क

पारोळा ः कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ दिवसांपासून संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यातच हातावर पोट असणाऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. यात प्रिटींग प्रेस व्यावसायिकांचे मशीनची चाके थांबल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंगच्या मशीनवरची हात थांबल्याने ते घरीच बसल्याने या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांसह इतर कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. गंभीर परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याबाबत शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी तालुक्यातील व्यावसायिकांनी केली आहे. 

लग्नसराईचा सिझनही गेला 
वर्षभरात जानेवारी ते जूनपर्यंत लहान- मोठी विवाह मुहूर्ताबरोबर छोटे- मोठे कार्यक्रम, उद्घाटन सोहळे, माहिती पत्रके, शैक्षणिक छपाईची कामे असतात. त्याबरोबर मार्च ते मे या तीन महिन्यात लग्नसराई मोठ्या प्रमाणात असल्याने सुमारे एक महिना अगोदर दिवसाच्या विवाह पत्रिका छापली जाते. मात्र, मार्च महिन्यापासून देश लॉकडाउन करण्यात आल्याने व्यावसायिक व कारागीर हतबल झाले आहेत. 

आर्थिक विवंचना 
जिल्ह्यासह तालुक्यात प्रिंटिंग प्रेसचे सुमारे १२०० व्यावसायिक आहेत. स्क्रीन व्यावसायिकांची संख्या सुमारे एक हजार आहे. या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्या कारागिरांची संख्या सुमारे पंधरा हजार आहे. मात्र, सध्या हाताला काम नसल्याने त्यांच्यासह कुटुंबीय विवंचनेत आहेत. 

व्यावसायिक, कारागिरांचे बोल….. 
लाँकडाउनमुळे छपाईकामे रखडली आहेत. पंधरा दिवसापासून कोरोनामुळे प्रिंटिंग प्रेस बंद आहे. कृषी केंद्र व इतर शासकीय व निमशासकीय कामे घेतली होती. मात्र, लॉकडाउनमुळे कामे रखडली आहेत. तसेच लॉकडाउननंतर परिस्थिती सावरण्यासाठी किती कालावधी लागतो हे सांगणे कठीण आहे. 
- प्रतीक मराठे, आशा प्रिंटिंग प्रेस, पारोळा. 

शेतीची कामे करून चरितार्थ 
गेल्या दहा ते बारा वर्षापासून फोटोग्राफीसह स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय करीत आहे. सध्या बंदमुळे छपाईचे काम येत नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ भागविणेसाठी शेतात काम करावे लागत आहे. सध्या त्यावरच उपजीविका सुरू आहे. 
- प्रवीण पाटील, देवांशू स्क्रीन, देवगाव ता. पारोळा. 

खाजगी प्रिंटिंग प्रेसवर मी बाईंडर म्हणून कारागीर आहे. काम करेल तरच घर चालेल अशी अवस्था आहे. किमान अशा काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी. 
- भगवान चौधरी, कारागीर, पारोळा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT