chandrakant patil
chandrakant patil 
उत्तर महाराष्ट्र

आमदारांची बसने सवारी 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः राज्य परिवहन महामंडळाच्या आवाज करणाऱ्या बसमधून प्रवाशांना येणारे अनुभव प्रत्यक्ष घेण्याचे काम मुक्ताईनगरचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज केले. मुक्ताईनगर ते जळगाव अशी बसची सवारी आमदार पाटील यांनी केली. 


मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय चंद्रकांत पाटील यांनी पत्नी यामिनी पाटील यांच्यासमवेत आज (ता.17) मुक्ताई ते मुक्ताईनगर ते जळगाव असा प्रवास एसटी बसने केला. दुपारी बाराच्या सुमारास ते मुक्ताईनगर बसस्थानकावरून बसले आणि तीन वाजता जळगाव बसस्थानकात आगमन झाले. या प्रवासादरम्यान आमदार पाटील यांनी एसटीमधील प्रवाशांची दिलखुलास चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासमवेत दिलीप पाटील, सुभाष टेलर, छोटू भाई, प्रफुल पाटील, गणेश डोंगे यांनी प्रवास केला. प्रथमच एका आमदाराला बस मध्ये प्रवास करताना बघून प्रवासी वर्ग त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. तसेच आपल्या समस्या देखील त्यांच्या जवळ मांडत होते. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या हमखास सोडविणार - आमदार पाटील 
प्रवासा संदर्भात त्यांना विचारले असता दैनंदिन एसटीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच एसटी कर्मचाऱ्यांशी हितगुज करून त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता हा प्रवास करीत असल्याचे सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या शिस्त आवेदन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जळगाव बसस्थानकावर त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी गोपाळ पाटील, दिलीप सूर्यवंशी आदींनी केले. 

अधिकाऱ्यांची घेतली भेट 
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगाव बसस्थानकावर उतरल्यानंतर विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यासह सर्व आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सुचना दिल्या. भुसावळ बसस्थानकाच्या नाहटा कॉलेज जवळील जागेला विकसित करावी. तसेच जळगावला बसपोर्ट करण्याबाबत कागदोपत्री पाठपुरावा करावा, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, मुक्ताईनगर आगारास चालक वाहकाची संख्या वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT