live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

गोष्ट...माय बनलेल्या बापाची ! 

राजेश सोनवणे

जळगाव ः लहान मुले असली आणि पत्नी देवा घरी गेली तर चिमुकल्यांना सांभाळण्यासाठी, तसेच वृद्धापकाळात साथ मिळावी यासाठी बहुतेक सर्वच जण दुसरा विवाह करतात, परंतु याला अपवाद ठरले आहेत शिवाजी नगरातील दिलीप सोनार. कर्करोगाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. यावेळी कवेत दहा महिन्याची मुलगी आणि बोट धरून चालणारा दीड वर्षाचा मुलगा यांच्यासह चार मुलांसाठी ते स्वतःच आई बनले. 

जळगावातील शिवाजीनगर परिसरातील दिलीप गोविंदा सोनार यांचे आई- वडील येथेच वास्तव्यास असल्याने तेथेच लहानशा 25 बाय 12 च्या पार्टिशनच्या घरात राहतात. लग्न झाल्यानंतर वडिलांना सोबत घेऊन संसाराला सुरवात केली. संसाराची गाडी हाकत असताना पत्नी संगीता यांना कर्करोगाने ग्रासले. पत्नीला आजारातून बरे करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. अखेर 12 जानेवारी 2011 मध्ये त्यांचे निधन झाले. तेव्हा कवेत दहा महिन्यांची मुलगी होती. तिच्याकडे पाहून अश्रू रोखले जात नव्हते. दहा महिन्यांच्या मुलींसोबत आणखी तीन मुले होती. पत्नी आजारी असल्याने चारही मुले दिलीप सोनार यांच्याच अंगावर अधिक होते. यामुळे त्यांना दूर कसे करायचे; या विचारातून चारही मुलांचा सांभाळ स्वतः आई बनून करत आहेत. 

स्वयंपाक करून भरविला घास 
घरची परिस्थिती जेमतेम. पत्नीला आजारातून बरे करण्यासाठी दहा वर्ष दवाखाना केला. यात होते तेवढे पैसे संपले. आज त्यांच्या पत्नीच्या निधनाला आठ वर्षांचा काळ लोटला गेला. पण एकाही दिवशी मुलांना आईची आठवण त्यांनी येऊ दिली नाही. दिलीप सोनार यांना महेश, रितेश, आदित्य आणि सर्वांत लहान मुलगी खुशी हे चार मुले आहेत. मुलगी खुशी ही नाथवाड्यात राहणारी लहान बहीण सुरेखाबाई हिच्याकडे आहे. पण तिचा खर्च दिलीप सोनारच करतात. तीनही मुलांना घेऊन ते शिवाजीनगरात एका लहानशा खोलीत राहत आहे. दिवसभर कामावर जायचे आणि रात्री कामावरून आल्यावर स्वयंपाक करून मुलांना अगोदर घास भरवायचा नंतर स्वतः खायायचे. इतकेच नाही तर मुलांची हौसमौज देखील करण्यात मागे राहिले नाही. 

मुलांना केले शिक्षित 
दिलीप सोनार हे एका क्रोकरी दुकानावर कामावर आहेत. घराचा खर्च भागेल इतके पैसे मिळतात. पण मुलांना शिक्षित करण्यासाठी दर रविवारी स्वतः लोटगाडी घेऊन कॉलन्यांमध्ये फिरून दोन पैसे कमवितात. मुले लहान असताना त्यांना पैशांसाठी कामाला लावले नाही. मोठा मुलगा महेश हा आता वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाला आहे. रितेश दहावीत, आदित्य सातवीला आणि मुलगी खुशी ही चौथीला आहे. मोठा मुलगा गेल्या वर्षभरापासून कॉलेज करून पार्टटाइम जॉब करून वडिलांना हातभार लावत आहे. आता त्यांना थोडा मुलांचा हातभार लागत असल्याने जातील हेही दिवस निघून असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाची भेदक गोलंदाजी, पण हेड- कमिन्सच्या फटकेबाजीमुळे हैदराबादचे मुंबईसमोर 174 धावांचे लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT