उत्तर महाराष्ट्र

"मुद्रा'अंतर्गत जिल्ह्यात 435 कोटींचे कर्जवाटप 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुद्रा कर्ज योजनेतंर्गत जिल्ह्यात यावर्षी 1 लाखावर खातेदारांना 435 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तर सन 2019-20च्या पतआराखड्यात अकृषक, पीककर्ज, कृषी कर्ज आदी विविध घटकांतील अडीच लाखांवर खातेदारांना साडेतीन हजार कोटींचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती आज जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत देण्यात आली. 

गटशेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून बॅंकांनी कर्जवितरण करताना शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी या बैठकीत दिल्या. या बैठकीस रिझर्व बॅंकेचे सहायक महाप्रबंधक प्रवीण सिंदकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे श्री. ईखारे, सहायक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प व्यवस्थापक पी. पी. शिरसाठ यांचेसह विविध बॅंका व महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

या दिल्या सूचना 
- बॅंकांनी प्राप्त झालेल्या पात्र अर्जांवर त्वरित कर्ज मंजूर करावे. 
- काही अडचण असल्यास त्यांना 15 दिवसांच्या आत लेखी उत्तर द्यावे. 
- प्रलंबित अर्जावर येत्या 31 डिसेंबरपूर्वी कार्यवाही करावी. 
- मुद्रा अंतर्गत पात्र अर्जदारांचे कर्ज तातडीने मंजूर करावे. 
- त्यासंबंधी माहितीसाठी प्रत्येक शाखेत अधिकारी नेमावा.

अन्य घटकांना साडेतीन हजार कोटी 
जिल्ह्याचा सन 2019-20 या वर्षाच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा हा 6 हजार 455 कोटी रुपयांचा असून 30 सप्टेंबरपर्यंत पीक कर्ज, कृषी कर्ज, अकृषक क्षेत्र, प्राधान्य क्षेत्र, व अप्राधान्य क्षेत्रातील 2 लाख 63 हजार 593 खातेदारांना 3 हजार 417.15 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अरुण प्रकाश यांनी बैठकीत दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Tilekarwadi Post Office Record: टिळेकरवाडीला नवे पोस्ट ऑफिस; आठ दिवसांत १०११ खाती उघडून विक्रमी कामगिरी

SCROLL FOR NEXT