dr. suyash nawal 
उत्तर महाराष्ट्र

 नोट्‌स पद्धतीने  नवाल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी; "वर्ल्ड रेकार्ड इंडिया'मध्ये  नोंद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः येथील नवाल हॉस्पिटलमध्ये 38 वर्षीय महिलेच्या पोटातून अडीच किलोचे गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया नोट्‌स पद्धतीने यशस्वी करण्यात आली. देशात प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया जळगावच्या नवाल हॉस्पिटलमध्ये नुकतीच करण्यात आली. या शस्त्रक्रियेची नोंद "वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया'मध्ये करण्यात आली असल्याची माहिती डॉ. सुयश नवाल यांनी दिली. 

नोट्‌स पद्धतीच्या शस्त्रक्रिया तसेच "वर्ल्ड रेकार्ड इंडिया'मध्ये नोंद झालेल्या शस्त्रक्रियांबद्दल पत्रकार परिषदेत डॉ. नवाल यांनी माहिती दिली. याप्रसंगी सुभाष नवाल उपस्थित होते. डॉ. सुयश नवाल यांनी सांगितले, की नोट्‌स पद्धतीने स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रियेची सुरवात तैवान, बेल्जियम व कोरिया या देशांमध्ये सुरू झाली होती. या नवीन पद्धतीत पोटावर एकही इजा अथवा चिरा न करता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येतात. या पद्धतीने भारतात पहिल्यांदाच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

साधारण दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेत किंवा कोणत्याही स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रियेत पोटाला चिरा दिल्या जातात व त्यानंतर टाके घातले जातात. दरम्यान, डॉ. सुयश नवाल हे दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झाले असता त्यांची भेट तैवान येथील डॉक्‍टरांशी झाली. याच चर्चेतून डॉ. नवाल यांनी प्रेरणा घेऊन भारतात प्रथमच 23 मार्च 2019 अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली. यावेळी त्यांच्या सोबत डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. ऋचा नवाल, डॉ. जयश्री राणे व नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओ. टी. टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. यात 38 वर्षीय महिलेचे अडीच किलोग्रॅम वजनाचे गर्भाशय काढण्यात आले. या नवतंत्रज्ञानातील कामगिरीमुळे "वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया'चे संपादक पावन सोलंकी यांच्याहस्ते सन्मानपत्र, सुवर्ण पदक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT