civil hospital
civil hospital 
उत्तर महाराष्ट्र

शंभर खाटांचे नवे महिला, बाल रुग्णालय राहणार उभे !

राजेश सोनवणे

जळगाव : जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यास दोन वर्षाचा कालावधी झाला. महाविद्यालयाच्या रूपाने राज्यातील पहिले "मेडिकल हब' जळगावात उभे राहत आहे. आता या पाठोपाठ शंभर खाटांचे नवीन महिला व बाल रुग्णालय उभारण्यास केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या रुग्णालयासाठी तीस कोटी रुपयांचा निधी देखील प्राप्त झाला आहे. 

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय सेवेचा विस्तार वाढत आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयानंतर मोहाडी शिवारात शंभर खाटांचे महिला रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानंतर आता आणखी एक महिला व बाल रुग्णालयाची उभारणी होणार आहे. या नवीन रूग्णालयामुळे प्रामुख्याने गर्भवती महिला, प्रसूतीनंतरचे इलाज तसेच नवजात शिशूसाठीच्या आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. याकरिता तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडे रुग्णालयाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास महिनाभरापूर्वी मंजुरी मिळाली आहे. 

एआरटी सेंटरला लागूनच नवी इमारत 
महिला व बाल रुग्णालयाची इमारत जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच दोन एकरच्या जागेत उभारण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या एआरटी सेंटरला लागूनच नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असून, गाड्या पार्क होण्याच्या जागेवर इमारतीचे बांधकाम होईल. तेथील सेवालयाची इमारत व पाणपोई पाडण्यात येणार आहे. याच नव्या इमारतीत तळमजल्यात पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. 

निधी प्राप्त, लवकरच मोजमाप 
दोन एकर जागेत दोन मजली इमारतीसाठी शासनाकडून 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तो जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. निधी मिळाला असल्याने कामाला गती देवून जागेचे मोजमाप करून इमारतीचे डिझाईन तयार करण्यासाठी आर्किटेक्‍टकडे देण्यात येणार आहे. कामासाठी ई टेंडरींग करण्यात येणार आहे. 

इमारतीत असे असतील वॉर्ड 
महिला व बाल रुग्णालयाच्या इमारतीत शंभर खाटांची व्यवस्था असणार आहे. यामध्ये गर्भवती महिलांसाठी 13 वॉर्ड, प्रसूतीनंतरच्या इलाजासाठी 3 वॉर्ड, सिझेरीयनचे 2 वॉर्ड, बाळांसाठी 2 वॉर्ड, एएनसी 2 वॉर्ड, एसएनसीयू 1 वॉर्ड, एनआरसी (कुपोषित बालकांसाठी) 1 वॉर्ड, ऑपरेशन थिएटर 4, डिईआयसी (स्पीच सेंटर, कानाची समस्या, ऑपरेशन) 1 वॉर्ड. 
 
"महिला व बाल रुग्णालय उभारणीसाठी तीन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता, त्यास मंजुरी मिळाली असून लवकरच रुग्णालय उभारणीच्या कामाला सुरवात करून साधारण एक वर्षात इमारत उभारणी करण्याचा प्रयत्न असेल. या रूग्णालयामुळे महिला व नवजात शिशूंना चांगली आरोग्य सेवा मिळू शकेल.' 
- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT