ZP school
ZP school 
उत्तर महाराष्ट्र

कळमसरे येथील संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

सकाळवृत्तसेवा

अमळनेर : कळमसरे (ता. अमळनेर) येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या जगदीश भास्कर पाटील या शिक्षकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही उमटून संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. मुलींच्या शाळेत महिलाच शिक्षिका नेमाव्यात ही भूमिका घेऊन जगदीश पाटील यास बडतर्फची मागणी केली. तर संबधित शिक्षकास आज पोलिसांनी ताब्यात घेतले.

कळमसरे (ता. अमळनेर) येथील शाळेतील विद्यार्थीनीचे शिक्षकानेच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधी शिक्षक जगदीश पाटीलवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, आज दुसऱ्या दिवशी संतप्त पालकांनी शाळेत येवून शाळेला कुलूप लावले. यामुळे शाळेतील इतर शिक्षकांनी बाहेर वर्ग भरवून मुलांना शिकविले. दरम्यान, प्रभारी गटविकास अधिकारी एस. डी. वायाळ यांनी संबंधित शिक्षकास निलंबित करण्याचे आदेश देऊन सोमवारी बडतर्फीचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सदर घटनेचे वृत्त कळताच गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, केंद्रप्रमुख अशोक सोनवणे, सहायक पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी शाळेत भेट दिली.

शिक्षणाधिकाऱ्यांना ही घटना समजल्यावर त्यांनी उपशिक्षणाधिकारी ए. बी. गायकवाड यांना शाळेत चौकशीसाठी पाठवले. तर बिऱ्हाडे यांनी मुली व पालकांचे जबाब घेतले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीही भ्रमणध्वनीवरून उपसरपंच मुरलीधर महाजन यांना पालकांच्या सोबत असल्याचे सांगितले. मधुकर माळी, मनोज चौधरी, अशोक बाविस्कर, शेतकी संघ संचालक पिंटू राजपूत आदी उपस्थित होते. 

घटना गंभीर असून शिक्षकाला तात्काळ निलंबित करून त्याचा बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव पाठवावा. कठोर कारवाई केली जाईल, असे उपशिक्षणाधिकारी ए. बी. गायकवाड यांनी भेटीप्रसंगी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : '400 जागा जिंकल्या तरी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण हटवणार नाही'; अमित शहांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT