उत्तर महाराष्ट्र

तहसीलदारांच्या वाहनावर वाळूमाफियांचा हल्ला!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील तहसील कार्यालयातील पथक निमखेडी शिवारातील नदीपात्रात कारवाईसाठी उतरत असताना वाळूमाफियांच्या एका गटाने त्यांच्या वाहनावर हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. वाहनांवर तुफान दगडफेक करीत भरधाव ट्रॅक्‍टरने वाहनातील अधिकाऱ्यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तलाठी राहुल पितांबर अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या आदेशाने वाळूचोरट्यांवर कारवाईसाठी तहसील कार्यालयाचे पथक वाहन (एमएच 19, एम 557) घेऊन निमखेडी शिवारातील गिरणा नदीपात्रात उतरले होते. शासकीय वाहनात राहुल अहिरे, परवेझ अहमद, मनोज सोनवणे, शशिकांत नेरकर, उमेश दांडगे यांच्यासह खासगी दुचाकीने इतर कर्मचारी व अधिकारी नदीपात्राकडे जात असताना, वाटेतच वाळूचा ठिय्या केलेला आढळून आला. त्यानंतर महसूल पथकाच्या अंगावर वाळूमाफियांनी ट्रॅक्‍टर आणले, तसेच वाहनावर तुफान दगडफेकही केली. दगडफेकीत तलाठी उमेश दांडगे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत तलाठी दांडगे यांना घेऊन "महसूल'चे पथक वाहन सोडून पळून आले. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांची दुचाकी उचलून फेकून देण्यात आली. याप्रकरणी राहुल अहिरे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

Sakal Vidya : स्पर्धा परीक्षा व करिअर अभ्यासक्रमाबाबत चिंचवडमध्ये येत्या रविवारी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

BG Kolse Patil : ‘पंतप्रधानांना ३०० कोटींचा हिशोब द्यावा लागेल’; माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांची टीका

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

SCROLL FOR NEXT