उत्तर महाराष्ट्र

एकाच रात्रीतून 335 आरोपींना अटक 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, यावल, अडावद, चोपडा, धरणगाव येथे ऑपरेशन अलाऊट अभियान राबवून एकाच रात्रीतून 335 आरोपींना अटक करण्यात आली. या अभियानांतर्गत नाकाबंदी करून 482 वाहनांवर कारवाई करीत 95 हजार 800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यात गुन्हेगारी व सवयीचे गुन्हेगार यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच वेळोवेळी तातडीने कारवाई करण्यात यावी यासाठी ऑपरेशन आलआऊट अभियान शुक्रवारी रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत राबविण्यात आले. हे अभियान दोन प्रकारचे होते. नाकाबंदी आणि कोम्बिंग यात आरोपी पसार झाला तरी नाकांबदीत अडकला पाहिजे असा उद्देश असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. 

अधीक्षक ते शिपायांचा सहभाग 
पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे स्वतः: रात्री दहा वाजेपासून ते पहाटेपर्यंत रस्त्यावर होते. यात प्रत्येक पोलिस ठाण्यातील 80 टक्के पोलिस रस्त्यावर उतरले होते. यात पोलिस अधीक्षक एक, अप्पर पोलिस अधीक्षक दोन, उपविभागीय पोलिस अधिकारी पाच, 64 पोलिस अधिकारी, 682 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. 

जिल्ह्यात नाकाबंदी 
जिल्ह्यात 35 पोलिस ठाण्याच्या हद्दीत 47 ठिकाणी नाकाबंदी राबविण्यात आली. या ठिकाणी 47 अधिकारी व 312 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. यात मोटार वाहन कायद्यान्वये 482 वाहनांवर कारवाई करून 95 हजार 800 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 12 जणांवरही कारवाई केली आहे. 

असे राबविले कोम्बिंग 
प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन पथके तयार करण्यात आली. दहा वाजता कारवाईला सुरवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात महामार्ग व इतर ढाब्यांची तपासणी करण्यात आली. यातून दारू विक्रीला आळा बसला. तसेच टॉपटेन गुन्हेगार, निगराणी बदमाश, माहिती असलेले गुन्हेगार, फरारी आरोपी, नॉन बेलेबल वॉरंटात मिळून येणारे आरोपी, तडीपार यांना अटक केली. गुन्हेगारांच्या वस्त्या, लपण्याची ठिकाणे या ठिकाणी छापा टाकण्यात आला. 

जळगावात धडक कारवाई 
शहरातील तांबापुरा, कंजरवाडा, गेंदालाल मिल भजेगल्ली यासह बहुतेक ठिकाणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कारवाई करून दारू नष्ट केली. भजेगल्ली किंवा इतर ठिकाणी दुकानांवर गुन्हेगार घुटमळत असतात यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या दुकानांवरही कारवाई केली आहे. 

अशी आहे कारवाई 
फरारी आरोप : 3 
पाहिजे आरोपी : 33 
नॉन बेलेबल वॉरंट आरोपी : 210 
बेलेबल वॉरंट आरोपी : 89 
हिस्ट्रीशिटर : 131 तपासले 
रेकॉर्डवरील गुन्हेगार : 181 तपासले 
टॉप टेन गुन्हेगार : 89 तपासले 
दारू पिऊन वाहन चालविणे : 12 
वाहनांवरील कारवाई : 482 
वसूल दंड : 95 हजार 800 रुपये 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT