उत्तर महाराष्ट्र

रेशन दुकानांवरून तेल, साखर गायब; मीठ मिळणार 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः सर्वसामान्य, गरिबांना रोजीरोटीसाठी लागणारे धान्य बाजारभावापेक्षा कमी दरात मिळावे यासाठी स्वस्त धान्य दुकानांतून होणारा धान्य, तेल, साखर, डाळी, भरड धान्यांचा पुरवठा करण्याचा कायदा झाला. दोन- तीन वर्षांपूर्वी सर्व कार्डधारकांना या वस्तू दर महिन्याला मिळत होत्या. यामुळे सणासुदीत स्वस्त धान्य दुकानांवर ग्राहकांची धान्यासह साखर, तेल घेण्यासाठी गर्दी होत असे. मात्र, दोन- तीन वर्षांपासून केशरी, पांढऱ्या कार्डधारकांना या वस्तू मिळत नाहीत. केवळ "अंत्योदय', "बीपीएल', "विशेष प्राधान्य' कार्डधारकांना धान्य मिळते. तेल, साखर तर मिळेनासी झाली आहे. 

स्वस्त धान्य दुकानांतून मिळणारे धान्य सर्वसामान्यांना अल्प दरात मिळत असल्याने जो-तो दरमहिन्याच्या दहा तारखेच्या आत दुकानांवर जाऊन धान्य आले का? याची चाचपणी करीत होता. धान्य आल्याचे कळताच तेथे ग्राहकांची गर्दी होत असे. काही वर्षांपूर्वी दसरा, दिवाळी, होळी या सणांमध्ये वाढीव साखर, पालतेलही मिळत असे. यामुळे सर्वसामान्यांसह गरिबांचे सण आनंदाने साजरे होत असत. आता मात्र उत्पन्नाप्रमाणे रेशन कार्ड दिले गेले. यामुळे पांढऱ्या व केशरी रंगाच्या कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांतून कोणतेही धान्य मिळत नाही. शासकीय कामांसाठी पुरावा म्हणून सध्या हे कार्ड ग्राह्य धरले जाते. 

या कार्डवर मिळते धान्य 
"अंत्योदय'सह प्राधान्य कुटुंबाचा शिक्‍का असलेल्या कार्डवर धान्य मिळते. अंत्योदय कार्डधारकाला 19 किलो गहू दोन रुपये दराने, सोळा किलो तांदूळ तीन रुपयांनी, प्राधान्य कुटुंबाला प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ वरील दरानेच मिळतो. दोन्ही कार्डांवर एक किलोप्रमाणे साखर मिळते. वीस रुपये तिचा दर असतो. 

तूरडाळ उपलब्ध 
स्वस्त धान्य दुकानांत तूरडाळ पस्तीस रुपये किलो "अंत्योदय'च्या कार्डधारकास उपलब्ध आहे. कार्डावर एकच किलो डाळ दिली जाते. उडीदडाळही लवकरच येणार आहे. मीठही लवकरच विक्री येईल. मिठाची आवक अजून स्वस्त धान्य दुकानांना मिळाली नाही. 

 
स्वस्त धान्य दुकानांतून पूर्वी तेल, साखरेचा अधिक पुरवठा होत असे. सध्या रेशनकार्ड केवळच नावालाच आहे. महागाई एकीकडे वाढली आहे. दुसरीकडे "रेशन'चा माल दिला जात नाही. शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पूर्वीसारखा "रेशन'वर माल उपलब्ध करावा. 
मीना विसपुते, ग्राहक 

शासनानेच पालतेल स्वस्त धान्य दुकानांतून देणे बंद केले आहे. सर्व कार्डधारकांना साखरेचा पुरवठा करण्याबाबत नुकतीच घोषणा झाली आहे. नियमित साखर, इतर धान्यांचा पुरवठा केला जात आहे. मिठाची मागणी नोंदविली आहे. लवकरच मीठ विक्रीसाठी स्वस्त धान्य दुकानांत असेल. 
- राहुल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी 


अशी आहे कार्डसंख्या ः 
अंत्योदय कार्ड ः 1 लाख 36 हजार 977 
बीपीएल कार्ड ः 52 लाख 15 हजार 727 
केशरी कार्ड ः 5 लाख 22 हजार 906 
अन्नपूर्णा कार्ड ः 1 हजार 996 
पांढरे कार्ड ः 72 हजार 468 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT