Gulabrao-Patil 
उत्तर महाराष्ट्र

तालुके दत्तक घेऊन विकास करणार : गुलाबराव पाटील  

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील तालुक्‍याचा विकास करण्यासाठी शिवसेनेचे आमदार जिल्ह्यातील तालुके दत्तक घेणार आहेत, तसेच जिल्ह्यातील अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची लवकरच आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता. 11) पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यातील शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांची बैठक शनिवारी (ता. 11) अजिंठा विश्रामगृहात झाली. यावेळी आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील शिवसेना तालुकाप्रमुखांची बैठक घेण्यात आली. तीत तालुक्‍यातील विकासासाठी त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. त्या- त्या तालुक्‍यातील अपूर्ण प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही लवकरच घेण्यात येईल. त्या- त्या प्रकल्पाबाबत काय अडचणी आहेत, याबाबतची माहितीही त्यांच्याकडून घेण्यात येईल. 

तालुके दत्तक घेणार 
आगामी सोळा- सतरा महिन्यांत जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने पक्षातर्फे नियोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील तालुक्‍यांचा विकास करण्यासाठी प्रत्येक शिवसेनेच्या आमदारांनी एक- दोन तालुके दत्तक घ्यावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने शिवसेना आमदार आता तालुके दत्तक घेऊन विकास करतील. 

"जलयुक्त'वरील स्थगिती उठविणार 
जिल्ह्यातील "जलयुक्त शिवार'चा निधी रोखण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नुकतीच केली होती. त्याबाबत मंत्री पाटील म्हणाले, की त्यांनी कोणताही निधी रोखलेला नाही, त्याला केवळ स्थगिती दिली आहे आणि ही स्थगितीही ते लवकरच उठवतील. पाणीपुरवठ्याच्या विविध 800 कोटींच्या योजनेवरील स्थगितीही त्यांनी नुकतीच उठविली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा ही जीवनावश्‍यक गरज आहे. त्यासंदर्भातही कोणतीही योजना रोखली जाणार नाही. 

खडसेंच्या कायम संपर्कात 
एकनाथराव खडसेंशी संपर्काविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की एकनाथराव खडसे यांच्याशी माझा कायमच संपर्क असतो, आताही आहेच आणि तो केवळ पक्षप्रवेशासंदर्भातच असतो असे नाही, इतर विषयांवरही असतोच. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मुरली + भज्जी + वॉर्न + कुंबळे! पठ्ठ्याची गोलंदाजी पाहून क्रिकेटविश्व स्तब्ध; इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दिली ऑफर

Nagar Panchayat-Nagar Parishad elections जाहीर… परंतु इच्छुकांना इशारा! ‘हे’ केल्यास थेट जेलची वारी! काय म्हणतो कायदा?

Bishnoi Gang: धक्कादायक! हल्लेखोर आले अन् धाड... धाड... धाड... प्रसिद्ध कबड्डीपटूला बिश्नोई टोळीनं संपवलं, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय पक्षाकडून तयारीला सुरुवात

NZ vs WI : न्यूझीलंडच्या ३७ धावांत ६ विकेट्स; वेस्ट इंडिजने सॉलिड मॅच फिरवली, ७ धावांनी बाजी मारली

SCROLL FOR NEXT