उत्तर महाराष्ट्र

सोने 300 रुपयांनी घसरले; चांदी मात्र स्थिर 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या चढ-उतारामुळे गुरुवारी (ता. 11) सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 35 हजारांवर गेले होते तर चांदी 40 हजार रुपये किलो असा भाव होता. मात्र, आज पुन्हा बाजारपेठेत डॉलर्सच्या भावात अस्थिरता व आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या परिणामामुळे सोन्याचे भाव 300 रुपयांनी घसरले. मात्र चांदीचे भाव स्थिर होते. 
जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यापासून सोने -चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होऊन सोने गुरुवारी 35 हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. डॉलर्सच्या भावात व आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या घडामोडी, त्यात नवीन अर्थसंकल्पात सोन्यावर एक्‍साईज ड्यूटीत दीड टक्‍क्‍याने वाढ झाल्याचा परिणाम सोने-चांदी दरवाढीवर झालेला दिसत आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत सोन्याच्या दरात चारशे रुपयांपर्यंत वाढ झाली तर चांदी 500 रुपयांनी वधारली. सोन्याचे दर गुरुवारी प्रति दहा ग्रमला 35 हजार रुपये तर चांदी 40 हजार रुपये किलो असे दर झाली; परंतु आज पुन्हा सोन्याच्या दरात 300 रुपयांनी घसरण झाली. 
 
सोन्याच्या दरातील चढ-उतार 
तारीख दर (प्रती 10) ग्रॅम चांदी (किलो) 
5 जुलै ........34 हजार 400.........39.500 
6 जुलै..........34 हजार 750....... 39.500 
7 जुलै......... 34 हजार 750....... 39.500 
8 जुलै..........34 हजार 750....... 39.500 
9 जुलै..........34 हजार 750....... 39.500 
10 जुलै......34 हजार 900....... 39.500 
11 जुलै.......35 हजार 000....... 40.000 
12 जुलै.......34 हजार 700....... 40.000 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT