sport
sport 
उत्तर महाराष्ट्र

"लॉकडाउन'मुळे युवा पुरस्कार वितरण अनिश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे वितरीत केले जाणारे युवा पुरस्कार यंदाही रखडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी हे पुरस्कार दिलेच नव्हते. यंदा दोन वर्षांचे पुरस्कार एकत्रित देण्याचे नियोजन होते. त्यासाठी प्रस्तावही मागविले. मात्र, "कोरोनो व्हायरस'च्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या "लॉकडाउनमुळे पुरस्कार वितरणाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. "ऑनलाइन' प्रस्ताव आले असताना त्याची "हार्डकॉपी' जमा करण्यात अडचण असल्याने निवड प्रक्रिया राबविणे अनिश्‍चित बनले आहे. 
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय युवा पुरस्कार दिले जातात. त्या अनुषंगाने एक महिला, एक पुरुष आणि एक संस्था अशांना दरवर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार वितरण महाराष्ट्रदिनी अर्थात 1 मेस वितरीत करण्यात येतात. परंतु, गेल्या वर्षीपासून पुरस्कार देणे रखडले आहे. 

"ऑनलाइन' प्रस्ताव दाखल 
युवा पुरस्कारासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे 15 मार्चला जाहिरात प्रसिद्ध झाली. हे प्रस्ताव दाखल करण्यासाठी गेल्या वर्षीपासून "ऑनलाइन' पद्धती सुरू झाली आहे. त्यानुसार 2018-19 आणि 2019-20 या काळातील पुरस्कारांसाठी 1 एप्रिलपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार दोन्ही वर्षांसाठी एकूण नऊ जणांनी प्रस्ताव दिले आहेत. 

"लॉकडाउन'मध्ये संपली मुदत 
जगभरात पसरलेल्या "कोरोना व्हायरस'ला नियंत्रणात आणण्यासाठी देशात दहा-अकरा दिवसांपासून "लॉकडाउन' सुरू आहे. या काळातच युवा पुरस्कारासाठीच्या प्रस्तावाची "हार्डकॉपी' जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करण्याची 3 एप्रिल ही मुदत संपली. त्यामुळे ऑनलाइन प्रस्ताव दाखल करणाऱ्यांना प्रस्तावासह कामांचे प्रमाणपत्र दाखल करता आले नाही. यामुळे आता "लॉकडाउन' संपल्यावर ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. परंतु, "लॉकडाउन' आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात असल्याने यंदाच्या पुरस्कार वितरणावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT