traffice police 
उत्तर महाराष्ट्र

महिला पोलिसाशी घातली हुज्जत अन्‌ मशिनही हिसकावले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : दुचाकीवरून ट्रीपलसीट जाणाऱ्या तरुणांना थांबवून दंड भरण्याच्या सूचना केल्याचा राग आल्याने दुचाकीवरील तिघा तरुणांनी महिला वाहतूक पोलिस व ट्रॅफिक वॉर्डन यांच्याशी हुज्जत घालून "ई-चलन डिव्हाईस' यंत्र हिसकावून घेतल्याचा प्रकार आज दुपारी पुष्पलता बेंडाळे चौक परिसरात घडला. या प्रकारानंतर तिघा तरुणांना वाहतूक शाखेत आणून चौकशी केली असता वाहन चालवणाऱ्याकडे परवाना देखील नसल्याची बाब समोर आली. यानंतर दोघांविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
शहर वाहतूक शाखेत कार्यरत सुनीता पाटील या आज ट्रॅफिक वार्डन उमेश ठाकूर यांच्यासह बेंडाळे चौक येथे कार्यरत होत्या. या दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच 19, डीई 4445) चौकातून तिघे जात होते. ट्रीपलसीट असल्याने कारवाईसाठी सुनीता पाटील यांनी दुचाकी थांबवून दुचाकीस्वार मोहन बडगुजर यास दंड भरण्याच्या सूचना केल्या. 

"ई-चलन' मशिन हिसकावले 
दुचाकी थांबविल्यानंतर दुचाकीस्वार बडगुजर यास वाहन परवान्याबद्दल विचारणा केली असता व "ट्रीपलसीट' का जात आहात, याबाबत विचारणा केली असता, त्याचा राग येऊन बडगुजरसह त्याच्यासोबतच्या तरुणाने आरडाओरड करत हुज्जत घालून गर्दी गोळा केली. कर्मचारी सुनीता पाटील यांनी ई चलन डिव्हाईस मशीनद्वारे त्यांचा गाडीचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मोहन बडगुजर याने सदर डिव्हाईस मशिन हिसकावून त्याच्या खिशात घातले. त्याच्यासोबतच्या मनोज चौधरी याने आरडाओरड करून आम्ही कोणत्याही प्रकारे दंड भरणार नाही, तुम्ही आमचे काही करून शकत नाही, या शब्दात तरुणांनी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यासह वार्डनला सुनावले. 

जबरीलूटीचा गुन्हा 
महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून दंड भरण्यास नकार देणाऱ्यामोहन बडगुजर (रा. पांझरापोळ टाकीजवळ), मनोज सुधाकर चौधरी (रा. विठ्ठलपेठ तेली गल्ली) या दोघांना कर्मचाऱ्यांनी वाहतूक शाखेत आणले. याठिकाणी पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी तिघा तरुणांची चौकशी केली असता, दुचाकीस्वार बडगुजर याच्याकडे परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर निरीक्षक कुनगर यांनी दोघाविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सुनीता पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात मोहन बडगुजर, मनोज चौधरी या दोघाविरोधात जबरी लूट, शासकीय कामात अडथळा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT