zilha parishad corona 
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना व्हायरसने जिल्ह्यात पाय पसरले असून, जळगावातील उच्चभ्रू वस्तीत देखील प्रवेश केला आहे. यातच जिल्हा परिषदेच्या एका उच्च पदस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनासह संपुर्ण आरोग्य यंत्रणा हादरली आहे. 

आवर्जून वाचा - जळगाव जिल्ह्यात "सारी'चा पहिला बळी

जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत बाहेरून आलेल्या नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत होते. आता मात्र कोरोना थर्ड स्टेजमध्ये अर्थात कम्युनिटी स्प्रेड होण्यास सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात आता जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यास देखील कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी (ता.11) रात्री प्राप्त झाला असून, याबाबत मात्र गोपनियता पाडली जात आहे. 

पालकमंत्र्याच्या बैठकीलाही उपस्थिती 
कोरोना व्हायरसच्या प्रार्श्‍वभुमीवर आरोग्य यंत्रणेची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी नियोजन भवनात बोलाविली होती. या बैठकीला देखील ते उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्‍वारंटाईन करण्यात येणार आहे. शिवाय त्यांच्या बंगल्यावर आठ ते दहा जण कामास येत असल्याने त्यांचा देखील संपर्क असून त्या सर्वांना क्‍वारंटाईन करण्यात येणार आहे. 

जिल्हा परिषदेत खळबळ 
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधीत अधिकाऱ्याच्या दालनातील कर्मचाऱ्यांसह संपुर्ण जिल्हा परिषदेच्या इमारतीत खळबळ उडाली आहे. कोरोनाची लागण झाल्याची बातमी मिळाल्यानंतर कर्मचारी भयभीत झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात १२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा कायम पावसाला पोषक वातावरण

Sinhagad Fort : जिथे शिवरायांच्या मावळ्यांनी पराक्रम गाजवला, त्या सिंहगडावर उभारणार १०० फुटी भगवा ध्वज

मराठी की अमराठी... तेजश्री प्रधानला दुसऱ्या लग्नासाठी कसा मुलगा हवाय? म्हणते- माझा होणारा नवरा फक्त...

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

25 लाखांचा प्रश्न आला, उत्तरही बरोबर होतं; तरी गेम सोडला! फीअभावी शाळेबाहेर पडलेला आज 400 मुलांचा ‘गुरू’

SCROLL FOR NEXT