live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

जि. प. अध्यक्षांच्या वाहनाला जबर अपघात

सकाळवृत्तसेवा

जळगाव : पालकमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यात सहभागी होण्यासाठी जळगाव जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील मुंबईहून जळगाव येथे येण्यासाठी निघाले होते. परंतू पहाटे तीनच्या सुमारास नाशिकजवळील ओझरजवळ अध्यक्ष उज्वला पाटील यांच्या खासगी इनोव्हा गाडीचा अपघात झाला. सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता कुठलीही जिवितहानी झाली नाही. 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा जिल्ह्यात दुष्काळी दौरा असल्यामुळे जि. प. अध्यक्ष उज्वला पाटील, पती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र पाटील हे परिवारासह मुंबईहून रात्री बाराला जळगावसाठी निघाले होते. नाशिक जवळील ओझर गावाजवळ स्पीड ब्रेकरवर गाडी असताना मागून (up.555) या ट्रॅकने जोराने धडक दिली. इनोव्हा गाडीचा भाग पूर्णतः चेपला गेला. मागच्या सिटवर बसलेला उज्वला पाटील यांचा भाचा सुदैवाने बचावला. किरकोळ दुखापत वगळता कुणासही मोठी दुखापत झाली नाही. वर्षभरापासून अध्यक्षायांच्या गाडीचा तिसऱ्यांदा अपघात झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून त्यांना कुठलीही इजा झाली नाही. अपघातातील ट्रॅक व चालक यांना ओझर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT