उत्तर महाराष्ट्र

निराधार वृध्दाला मुस्लीम कुटूंबियाने दिली माती ;माणूसकीचे घडले दर्शन 

शंकर भामेरे

पहूर,जामनेर  : "ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा ; ईन्सान की औलाद है ईन्सान बनेगा " या 'धूल का फुल ' चित्रपटातील मुहम्मद रफी यांच्या गीताची आठवण व्हावी , असा प्रसंग पहूरकरांनी अनुभवला . मुस्लीम कुटूंबियांनी निराधार वृध्दावर अंत्यसंस्कार करून माणूसकी जिवंत असल्याचा प्रत्यय दिला .

गेल्या चार वर्षांपासून सलीम खाँन उस्मान खाँन यांच्या लोहारा रस्त्यावरील शेतात राहात असलेल्या सखाराम आनंदा मोरे (वय 65) या निराधार वृध्दाचे काल ( ता. 26 ) वार्धक्याने निधन झाले. चार वर्षापासून सलीम खान हेच त्यांचा सांभाळ करीत होते . त्यांना एक विवाहीत मुलगी असून बोदवड येथे राहते . सलीम खॉन यांनी त्यांच्या मुलीशी संपर्क केला ,मात्र अंत्यसंस्काराला येणे शक्य नसल्याचे मुलीने सांगीतले . त्यानंतर सलीम खाॅन यांनी माजी पंचायत समीती सभापती बाबुराव घोंगडे यांना कळविले . त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने मयतावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शवली .अखेर माणूसकी धर्म पाळत सलीम खाँन आणि त्यांच्या परिवाराने मोरे यांच्या पार्थिवाला माती दिली. ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले .या प्रसंगी पहूर कसबे सरपंच पती शंकर घोंगडे , ग्राम पंचायत कर्मचारी दिलीप बावस्कर , सुनिल बावस्कर , योगेश बावस्कर आदींची उपस्थिती होती.माणसातील माणूसकीचे दर्शन यावेळी घडले .

नक्की वाचा :  जोशीपेठमध्ये मनपा अतिक्रमण पथकावर दगड फेक ः एक जण जखमी 

"माणूसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे . सखाराम मोरे यांचा चार वर्षांपासून आम्ही सांभाळ करीत होतो . ते शेतावर कामही करायचे .जणू काही ते आमच्याच कुटूंबाचा भाग बनले होते . त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांना दुःख होत आहे . ''
सलीम खान उस्मान खान पहूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT