onion farm
onion farm 
उत्तर महाराष्ट्र

मजुरांद्वारे लागवडीऐवजी कांद्याची चक्क पेरणी! 

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : कांद्याने केला वांदा अशी स्थिती नेहमीच निर्माण होते. भाव आहे तर कांदा नाही अन्‌ कांदा आहे तर भाव नाही, असे समीकरण जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेले. कांद्यामुळे कर्जबाजारी झालेले, भाव न मिळाल्याने आत्महत्या केलेले शेतकरीही बरेच आहेत. म्हणूनच कांद्याला खानदेशात जुगार म्हटले जाते. तरीही कांदा लागवडीचे क्षेत्र वाढतेच आहे.


एखाद्याने "कांदे पेरले' असे म्हटले, तर ऐकताना चुकल्यासारखे वाटते. मात्र, कांदा पेरण्याची ही किमया शिंदे यांनी केली आहे. एरवी कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. मोठ्या प्रमाणात मजुरांचीही गरज भासते. अनेकदा स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने ते बाहेरून आणावे लागतात. यावर खर्चही मोठा होतो. यावर कशी मात करता येईल या विचारात असताना रोज "सकाळ ऍग्रोवन'चे वाचन करणाऱ्या शिंदे यांना कांदा पेरणी यंत्राची माहिती मिळाली अन्‌ त्यांनी हे यंत्र विकत घेत 25 एकर क्षेत्रात कांदा पेरणी केली. हा प्रयोग यशस्वी होऊन त्यांचे कांदा पीक बहरले असून, आता ते काढणीवर आले आहे. कांदा पीक पाहण्यासाठी ठिकठिकाणचे शेतकरी भेट देऊन माहिती घेत आहेत. सोशल मीडियावरही किशोर शिंदे यांचा पेरणी केलेल्या कांद्याची माहिती देतानाचा व्हीडीओही शेतकऱ्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने इतर शेतकऱ्यांनीही यंत्राने कांदा पेरणी केली आहे. 
एकरी किमान शंभर क्विंटलही उत्पादन गृहीत धरले तरी किमान दोन हजार पाचशे क्विंटल कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे. प्रतिक्विंटल दोन हजार रुपये भाव मिळाला तरी त्यांना सुमारे 50 ते 60 लाखांचे उत्पादन मिळणार आहे. 


कांद्याची लागवड करण्यापेक्षा पेरणी करणे नेहमीच फायदेशीर असते. "सकाळ ऍग्रोवन'मधून मला हा सल्ला मिळाला अन्‌ मी कांद्याची पेरणी केली. कांद्याचे पीक चांगलेच बहरले आहे. त्यासाठी होणारा खर्चही आवाक्‍यात आला आहे. पीक पाहण्यासाठी खानदेशातून शेतकरी येत आहेत. अन्य शेतकऱ्यांनीही असा प्रयोग जरूर करावा. 
- किशोर शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी, कुसुंबा, ता. धुळे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT