उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात नदी-नाले बंधारे खोलीकरणाला ब्रेक ?

वास्तविक नदी नाले बंधारे खोली करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लॉक डाऊन ची अडचण नव्हती

जगन्नाथ पाटील



कापडणे : जिल्ह्यात पाणी फाउंडेशन (Water Foundation) तर्फे विविध गावा शिवारातील नदी-नाले बंधारे (Rivers and streams) खोलीकरणाच्या कामाला तीन वर्षांपासून गती मिळाली होती. त्याच बरोबर जिल्ह्यातील काही सेवाभावी संस्था खोलीकरणाच्या कामाला हातभार लावत होत्या. यामुळे जिल्ह्यात सिंचनाचे (Irrigation) प्रमाण वाढत होते. गेल्या वर्षांच्या मार्चपासून खोलीकरणाच्या कामाला ब्रेक (Deepening work break) बसला आहे. ही कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून (farmer) होत आहे.


(dhule district rivers streams deepening work break)

धुळे जिल्ह्यात राज्यपातळीवरील पाणी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने मोठ्या प्रमाणात 'पाणी थांबवा पाणी आडवा पाणी जिरवा' या संकल्पनेला जोड दिली होती. ती राबविण्यासाठी प्रत्येक गावातील स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले होते. स्पर्धेच्या माध्यमातून गावे पाणीदार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते. तीन वर्षात मोठ्या प्रमाणात खोलीकरणाची कामे झाली. आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर कृतज्ञता ट्रन्टच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात कामे झालीत.


गेल्या वर्षाच्या मार्चपासून कोरोना लॉक डाऊन सुरू झाले. उन्हाळ्यातील खोलीकरणाच्या कामाला पूर्णविराम मिळाला. यावर्षीही मार्च पासूनच लाॅक डाऊन सुरू आहे. खोलीकरणाची कामे सुरू झाली नाहीत. वास्तविक नदी नाले बंधारे खोली करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लॉक डाऊन ची अडचण नव्हती. मात्र याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी कानाडोळा केला असल्याचे चर्चिले जात आहे. दरम्यान जिल्ह्यात सलग पाच वर्षे नाले बंधारे खुली करण्याची कामे सुरू राहिल्यास पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. सिंचनाच्या टक्का शंभरावर पोहोचणार आहे. यासाठी शेतकऱ्यांची जागरूकता व लोकप्रतिनिधींची सहजगता आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT