live
live 
उत्तर महाराष्ट्र

"रसदास'च्या स्वरगंगेने गाभारा झाला पुलकित...!  सकाळ-बैठक फाऊंडेशनचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक  : पहाटेचा झुळुझुळु वारा अंगाखांद्यावर मिरवीत संथ वाहणारी गोदावरी... त्याच गोदामाईच्या काठावर शतकानुशतके उभे असलेले नारोशंकर मंदिर...एकेकाळी नाशिकला विविध घटनांची दवंडी देणाऱ्या येथील ऐतिहासिक घंटेसाठी प्रसिद्ध असलेल्या नारोशंकराच्या गाभाऱ्यात आज सुरांचे दिवे लागले..."सकाळ÷' अनुनाद,बैठक फाउंडेशनतर्फे रसदास या टोपननावाने ओळखले जाणारे जेष्ठ गायक पंडित अरुण कशाळकर यांच्या गायन मैफलीत त्यांच्या धीरगंभीर सुरांनी गोदाकाठावरची आजचा दिवस सुरेल झाली,संस्मरणीय ठरली. 

या अनोख्या मैफलीसाठी नारोशंकर मंदीराचा गाभारा तसेच परिसर आकर्षक फुलांनी,रांगोळींने सजविण्यात आला,दिव्यांचा लखलखाट आणि त्याजोडीला चंदन उदबत्तीच्या सुगंधाने संपूर्ण परिसर दरवळला होता. मोजक्‍या पण जाणकार दर्दी रसिकांची या बैठकीसाठीची उपस्थिती नाशिकचे सांस्कृतिकपण अधोरेखीत करणारी अशीच होती अर्थात रसदास उर्फ पंडित कशाळकर यांची मैफलीत समरस व्हायला सारेच आले होते. पंडितजीच्या गायनामध्ये जयपुर, ग्वाल्हेर आणि आग्रा या तिन्ही घराण्यांचा सुरेख संगम दिसून येतो. विशेषतः आग्रा घराण्याची गायकी पंडित कशाळकर यांच्या स्वरांमध्ये दिसते.राग बैरागी विस्तृत "नोंम तोम' अलापने ही मैफल सुरु झाली. "तु विधाता तू दाता' ही रूपक तालातील बंदिश सुरु झालेल्या आजच्या मैफलीत पंडितजींनी ध्रुपद धमार आणि ख्याल गायकी उस्फुर्त आणि अत्यंत सुंदर दर्शन उपस्थित घडविले. 

त्रिवेणी संगमाचा सूर अविष्कार 
प्रत्येक व्यक्ती ही परमेश्‍वराच्या नामसाधनेत स्वतःला एकरूप करण्याचा प्रयत्न करते. परमेश्‍वराशी ही जवळीक साधणाऱ्या आराधनेत तल्लीनता दिसून येते हे सांगतांना त्यांनी "हर हर महादेव शंकर' ही तीनतालातील बंदीश पेश केली. 76 व्या वर्षीतही आवाजातील त्याचा चढउतारांचा अनोखा बाज नाशिककरांना पहायला मिळाला. ग्वाल्हेर घराण्याचा पंडित गजाननबुवा आणि आग्रा घराण्याचे पंडित बबनराव हळदणकर यांच्या शिकवणीचा आणि सूरांसाठी हवी असलेली हुकूमत यानिमित्ताने दिसून आली. तीन तालांतून ते राग तोडीत कधी घेऊन गेले हे रसिकांनी समजले नाही. स्वरचित एकतालातील गुनन गानू ही बंदीश बरेच काही सांगुन गेली. दर्दी रसिकांनी बऱ्याच दिवसानंतर स्वरचित व ध्रुपद गायकीचे हे रूप अनुभवले. तीन घराण्यांच्या त्रिवेणी संगमाचा हा सूर आविष्कार ज्या गोदावरीच्या साक्षीने घडत होता त्याच परिसरात अरुणा व वरुणा या नद्यांचाही गोदावरीशी संगम होतो हाही एक दुर्मिळ योग !! 


गायकीचा विशेष प्रभा पण स्वरचितावर भर 
पंडितजींच्या मैफलीत आग्रा घराण्याच्या गायकीवर विशेष भर असतो. अर्थात या मैफलीतही या प्रभावाची रसिकांनी अनुभूती आली असलीतरी त्यांनी स्वरचित बंदिश सादर करण्याला प्राधान्य दिले. नाशिकला येत असतांना गाडीत सूचलेल्या ओळी बहादुरी तोडी या "शिव शंकर गंगाधर' हा आडचौतालात परमेश्‍वराची भक्ती करतांना तल्लीनता किती हवी हे त्यांनी दाखविले. रसदास या टोपन नावाने त्यांनी काही बंदिशी रचल्या आहेत, "स्वअर्चना' या त्यांच्या पुस्तकात स्वतः रचलेल्या दिडशेहुन अधिक बंदीशी संग्रहित आहेत. राग भैरवी सादर करतांना तीन तालात त्यांनी "महादेव महेश्‍वर देवनपती' सादर करत रसिकांनीही आपल्या जोडीला गाण्याची संधी दिली. याच अनोख्या तीनतालाने मैफलीचा त्यांनी समारोप केला. पंडितजींना मुकूल कुलकर्णी,विशाल मोघे यांनी साथसंगत केली. स्वानंद बेदरकर यांनी मैफलीमागची संकल्पना विषद केली. नारोशंकर मंदीराचे विश्‍वत निशीकांत राजेबहादर यांनी पंडित कशाळकर यांच्या गायकीचे महत्व आपल्या कवितेतून सांगितले. 

विना संवादिनी,तबला, फक्त शुध्द गाणे अन्‌ रसिक 
गावातील दुर्लक्षित मंदीराच्या गाभाऱ्याच्या ठिकाणी अशा पध्दतीने मैफलीचे आयोजन करून भाविक, रसिकांना एकत्र आणण्याचा आणि सांस्कृतिपण टिकविण्याचा सकाळ अनुनाद आणि बैठक फाउंडेशनचा प्रयत्न आहे. त्यासाठी पुण्यातील ओंकारेश्‍वर मंदीरात पहिली मैफल घेऊन मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 
नाशिकली आज दुसरी मैफील झाली. नामवंत कलावंतास आमंत्रित करून त्यांचे शुध्द गाणे दर्दी रसिकांनी ऐकण्याची संधीच जणू यानिमित्ताने उपलब्ध करून दिली जात आहे. नाशिकच्या या उपक्रमासही चांगली दाद मिळाली.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT