Earthquake 
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात भूकंप; रिश्टर स्केलवर ३.२ ची नोंद

Nandurbar Earthquake News: भुकंपामुळे तळोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

भूकंपाचा परिसर २१.७९८ अक्षांश व ७४.२७५ रेखांश होता तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पोटात १३.५ किलोमीटर अंतरावर होता.


तळोदा : तळोदा तालुक्यात दुपारी ४.४५ वाजता भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर (Richter scale) धक्क्यांची तीव्रता ३.२ भूकंपमापक केंद्र सावळदा (Seismic center Savalda) येथे नोंद करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू सरदार सरोवर (Sardar Sarovar) पासून ५६ किलोमीटरवर असल्याचे भूकंपमापन केंद्र गांधीनगर (Earthquake Measurement Center Gandhinagar) यांनी नोंद केली आहे.

आज झालेल्या भुकंपामुळे तळोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी एकमेकांना फोन करून भूकंपाची माहिती घेतली तसेच सोशल मीडियावर माहिती व्हायरल होत होती.

भुकंपाचा केंद्रबिंदू पुथ्वीच्या पोटात

भूकंपाचा परिसर २१.७९८ अक्षांश व ७४.२७५ रेखांश होता तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पोटात १३.५ किलोमीटर अंतरावर होता. दरम्यान तळोदा तालुक्यात तळोदा शहर, प्रतापपूर परिसरात नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवल्याचे व्हायरल होत होते.

भूकंपाची तीव्रता ३.२

केंद्र सावळदा येथील रिश्टर स्केलवर भुकंपाची तिव्रता ३,२ नोंदविण्यात आली. तसेच एकमेकांना फोन करून भूकंपा बाबत विचारणा केली जात होती. घरात असलेल्या अनेक गृहिणी व नागरिकांनी भूकंपामुळे हालचाल जाणवल्याचे सांगितले. दरम्यान या भूकंपामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन भीतीसह कुतूहल निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT