lockdown  
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात ३१ जुलैपर्यत लॉकडाऊन 

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यात काही शिथिलतेसह लॉकडाऊन कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आज याबाबतचे आदेश काढले आहेत. मागील सर्व आदेशातील बाबींचाही समावेश आहे. सार्वजनिक, कामकाजाच्या ठिकाणी आणि बाहेर फिरताना मास्क बंधनकारक आहे. दोन व्यक्तीत ६ फूटांचे अंतर आवश्यक आहे. दुकानांमध्ये एकावेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक नसणार आहेत. 

मोठे समारंभ किंवा सोहळ्यांना परवानगी राहणार नाही. लग्नकार्यात ५० पेक्षा अधिक व्यक्ती नको, खुली जागा, लॉन्सच्या ठिकाणी लग्नकार्यास अनुमती असेल. अंत्यसंस्कारास ५० पेक्षा अधिक व्यक्ती नसावेत, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू किंवा दारूच्या सेवनावर प्रतिबंध राहतील. कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. 
जीवनावश्यक वस्तू आणि सेवांची सर्व दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. मॉल्स ,व्यापारी संकुला व्यतिरिक्त इतर दुकाने सकाळी ९ ते ५ या वेळेत सुरू राहतील. ई-कॉमर्स सेवा सुरू राहील. सद्यःस्थितीत सुरू असलेले उद्योग आहे त्याप्रमाणे सुरू राहतील. हॉटेल, खानावळीतून घरपोच सेवेला परवानगी राहील. टॅक्सी किंवा कॅब, रिक्शा आणि चारचाकीसाठी वाहनचालकासह केवळ २ प्रवाशांना अनुमती राहील. दुचाकीवर केवळ चालकाला अनुमती असेल. जिल्ह्याअंतर्गत बससेवेला ५० टक्के वाहतुकीस अनुमती असेल. आंतरजिल्हा वाहतुकीस प्रतिबंध असतील. 
प्लंबर, इलेक्ट्रीशिअन, पेस्ट कंट्रोल आदी स्वयंरोजगारांना अनुमती राहील. गॅरेज आणि वर्कशॉप दिलेल्या वेळेनुसार दुरुस्तीची कामे करतील. घराबाहेर व्यायाम करताना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे लागेल. वृत्तपत्र मुद्रण आणि वितरणाला अनुमती राहील. शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांना अध्यापनाव्यतिरिक्त इतर कामांसाठी (ई कंटेन्ट तयार करणे, निकाल जाहीर करणे, उत्तरपत्रिका तपासणे) शाळा-महाविद्यालयात जाण्याची अनुमती आहे. सलून, स्पा, बार्बर शॉप, ब्युटी पार्लर दिलेल्या अटींचे पालन करून सुरू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Junnar News : जुन्नर तालुक्यातील रस्त्यांना कायदेशीर ओळख; सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले गाव

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

SCROLL FOR NEXT