corona vaccination
corona vaccination corona vaccination
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्याने लसीकरणाचा दोन लाखांचा टप्पा ओलांडला !

धनराज माळी

नंदुरबार ः जिल्ह्यात कोरोना लसीचे (corona vaccination) दोन लाख डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी १ लाख ६० हजार ६३२ व्यक्तींना पहिला डोस तर ४० हजार ७९२ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे.

(nandurbar district corona vaccination two lake complete)

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ रोजी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी (Minister Adv. KC Padvi) यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभाच्या दिवशी ४ केंद्रांवर २६५ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले होते. तर १२ मे रोजी ७० शासकीय केंद्रांवर ६ हजार ६२५ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. नंतरच्या टप्प्यात कोरोना नियंत्रणासाठी काम करणारे कर्मचारी (फ्रंट लाईन वर्कर) (Front line worker) आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.जिल्ह्याने २२ एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला. पालकमंत्री पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: लस घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले.

जनजागृतीचा फायदा
नागरिकांच्या मनामध्ये लसीकरणाविषयी अनेक गैरसमज असल्याने प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील लसीकरणासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेत शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरली आहे. ग्रामीण भागातील जनजागृतीसह लाभार्थ्यांच्या नोंदणीचे कामदेखील शिक्षकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी लोककला, स्थानिक भाषा, बैठका, घरोघरी भेटी आदी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे.

शिक्षकांकडून नोंदणीचा लाभ
नोंदणी झालेल्या गावात लसीकरणासाठी फिरते पथक पाठवून शिबिरांच्या आयोजनाद्वारे लसीकरणाला गती देण्याचे यशस्वी ठरले आहेत. यासाठी प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी दोन आणि अक्कलकुवा व धडगावसाठी चार वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली. आरोग्य विभागाचे कर्मचारी लसीकरणासाठी विशेष परीश्रम घेत आहेत. ग्रामस्तरावरील मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींचा सहभागही महत्वाचा ठरला. खाजगी शाळांच्या सहकार्याने नागरिकांना शिबिरस्थळी आणण्यासाठी स्कूल बसचा उपयोग सुरू करण्यात आला. काही गावात ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले. याचा एकत्रित परिणाम म्हणून मागील केवळ २१ दिवसात आणखी १ लाख लसींचे डोस देण्यात येऊन दोन लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यात १३ हजार ६६५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर ७ हजार ७२० कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १० हजार ५३६ फ्रंट लाईन वर्कर्सनी पहिला तर ८८४३ कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील १४ हजारपेक्षा अधिक व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील १ लाख १० हजार ७८६ व्यक्तींनी पहिला तर २४ हजार २३४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण उद्दीष्टाच्या ११.२ टक्के लाभार्थ्यांनी पहिला तर २.८० टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. शुक्रवारपासून दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेलादेखील अधिक गती देण्यात येणार आहे.


लसीकरणाचा एकालाही त्रास नाही
आतापर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांना कुठलाही गंभीर त्रास झालेला नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT