उत्तर महाराष्ट्र

नंदुरबारः पंचायतराज समितीच्या नावे.. पैसा गोळा करण्याचा प्रकार

पैसा जातो तरी कुठे? खर्चाची तरतूद असताना कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यामागचे गौडबंगाल काय?

धनराज माळी

नंदुरबार : पंचायतराज समिती (Panchayat Raj Committee) आज पासून नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आली आहे. ही समिती तीन दिवस जिल्ह्यात राहणार असून या समितीच्या दौऱ्यानिमित्तही जिल्हा परिषद (Zilla Parishad) प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा केला जात आहे. महिनाभरापूर्वी महिला व बाल कल्याण समितीच्या (Women and Child Welfare Committee) दौऱ्यानिमित्त असाच प्रकार झाला होता. समित्यांच्या दौऱ्यांच्या नावाने गोळा केला जात असलेले लाखो रुपये खर्च होतो तरी कुठे? असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेसह निधी देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पडला आहे. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारी वैतागले असून नाराजी व्यक्त होत आहे.


जिल्ह्यातील कामांच्या पाहणीसाठी येणाऱ्या समितीच्या नावाने पैसे जमा करणे तेही लाखोंच्या घरात त्याचा आकडा जातो. येणाऱ्या समितीच्या दौऱ्याच्या खर्चासाठी डी.पी.डि.सी मधून लाखो रुपयांची तरतूद केलेली असते. तरीही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सक्तीने ठराविक रक्कम जमा केली जात आहे. त्यामुळे हा पैसा जातो तरी कुठे? खर्चाची तरतूद असताना कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यामागचे गौडबंगाल काय? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. याबाबत काही कर्मचाऱ्यांनी नावे न सांगण्याचा बोलीवर पैसे गोळा कसे केले जात आहेत. याची हकिगत ‘सकाळ’ ला सांगितली.

महिनाभरापूर्वी महिला बालकल्याण समितीच्या दौऱ्यात महिला बाल विकास विभाग अंगणवाडीसेवकांपासून तर पर्यवेक्षकांपर्यंत व प्राथमिक शिक्षकांकडून लाखो रुपये उकळले. त्यानंतर आता पुन्हा पंचायतराज समिती दौऱ्यानिमित्त जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक, अभियंते, शिपाई, लिपिक आदी कर्मचाऱ्यांकडून २ हजारांपासून तर २५ हजारांपर्यंतची रक्कम ठरवून दिली. त्याप्रमाणे ती रक्कम गोळा केल्याची चर्चा आहे. हा पैसा समितीच्या नावाने गोळा करून जातो तरी कुठे? चुकीचे कामे, निकृष्ट कामे, भ्रष्टाचार लपविण्यासाठी समितीला काही दिले तर जात नाही ना, की मग समितीच्या नावाने गोळा करून समितीला बदनाम करण्याचा डाव आहे. याबाबत समितीनेच याची दखल घेऊन योग्य तो छडा लावणे आवश्‍यक असल्याची अपेक्षा कर्मचारी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT