farmer waiting rain
farmer waiting rain sakal
उत्तर महाराष्ट्र

अर्धा जून संपूनही पेरणीयुक्त पाऊस नाही; शेतकरी म्हणताहेत गेला पाऊस कुणीकडे

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : आग औकणाऱ्या उन्हात खरीपपूर्व मशागतीचे काम आटोपून शेतकरी (Farmer) खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे. महागडे बियाणे खरेदी करून आगात कापूसची लागवड मे महिन्यातच केली आहे.ती लागवड वाचविण्यासाठी आता पावसाची नितांत गरज आहे. मात्र जूनच्या या १५ दिवसात किरकोळ पाऊस वगळता त जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक बरसलाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर गेला पाऊस कुणी कडे असे म्हणण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या प्रतिक्षेत (Waiting rain farmer) आकाशाकडे लागले आहेत. (nandurbar-june-month-half-but-farmer-waiting-rain)

शेती म्हटली म्हणजे पावसावरच सारा काही खेळ आहे. पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला तरच खरीप व रब्बी हंगामाची व उन्हाळ्यातील पिण्याचा पाण्याचे नियोजन अवलंबून असते. गोल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना आपतकालीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. बेमोसमी पाऊस हे दरवर्षीचे समीकरण झाले आहे. जेव्हा पावसाची गरज तेव्हा तो बरसत नाही. जेव्हा पिके काढणीची वेळ येते, हातातला घास तोंडापर्ंयत येतो अन् तेव्हा पाऊस येऊन होताचे नव्हते करून जातो. असे चित्र गेल्या तीन वर्षापासून शेतकरी अनुभवताहेत.

आकाशाकडे डोळे

गेल्या वर्षी मुसळदार पाऊस झाला. खरीपाचे नुकसान झाले. मात्र रब्बी हगाम चांगला झाला. ती कामे आटोपून भडभडत्या उन्हाचे चटके अंगावर घेत शेतकऱ्यांनी यंदाचा खरीपासाठी जमीनीची मशागत करून पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. किरकोळ स्वरूपाच पाऊस वगळता अद्याप खरीपाचा पेरणीयुक्‍त पाऊसच झालेला नाही. बागायतदार शेतकऱ्यांनी विहिरी, कुपनलिकाचे पाणी देऊन मे महिन्यात कापूसची लागवड करून टाकली. कापूस उगवलाही मात्र, आता त्याला पावसाची गरज आहे. ठिबकची सुविधा असलेले शेतकरी पाणी देत आहेत. पिक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

ऊन सावल्‍यांचा खेळ सुरूच

अनेकांनी पाऊस झाल्यावर लागवडीचे नियोजन केले आहे. तर खरीप पिकांसाठी पेरणीयुक्तही पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचा पेरण्याही खोळंबल्या आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करून पावसाची प्रतिक्षा करीत आकाशाकडे डोळे भिरवित आहेत. तरीही अद्याप पावसाचा ठांगपत्ता नाही. उन सवल्यांचा खेळ सुरू आहे. कधी पावसाचे ढग आकाशात भरून येतात, तर कधी विजांचा कडकडाट होतो. मात्र पाऊस येत नाही. त्यामुळे गेला पाऊस कुणीकडे असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नैसर्गिक वातावरणामुळे ७ जूनचा अंदाज चुकला

पूर्वी शेतकऱ्यांचा अंदाजानुसार ७ जूनला पहिला जोरदार पाऊस होत असे. त्या पावसानंतर खरीप पेरणीला सुरूवात होत होती. तो अंदाज खरा ठरत होता. मात्र गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक असमतोलपणामुळे तो अंदाज आता फोल ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस केव्हा येईल, याचा अंदाज वर्तविणे जिकरिचे झाले आहे. अन्यथा ७ जून नंतरचा पावसानंतर पेरण्या हमखास सुरू व्हायच्या असे, शेतकऱ्यांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT