kuposhit child
kuposhit child 
उत्तर महाराष्ट्र

१५ महिन्याचा बाळाचे वजन केवळ ४ किलो; खोलनपाड्यात कुपोषित बालक

सम्राट महाजन

तळोदा : मान्सूनपूर्व सॅम - मॅम बालकांच्या विशेष तपासणीत एका १५ महिन्यांचा बालक कुपोषित आढळून आला आहे. आरोग्य पथकाने बालकाला धडगाव येथील कुपोषण पुनर्वसन केंद्रात दाखल केले. त्या बालकाचा गावांपर्यंत जाण्यासाठी जेमतेम रस्ता, त्यातही लॉकडाउन, अश्या परिस्थितीत चिंताजनक अवस्था असलेल्या त्या बालकाला योग्यवेळी आवश्यक उपचार मिळालेत, नाहीतर पुढे त्या बालकाची अवस्था अधिक गंभीर होण्याची शक्यता होती.

दरवर्षी आरोग्य प्रशासनाद्वारे पावसाळा सुरु होण्यापूर्वी अतिदुर्गम भागातील गाव, पाड्यावरील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील ० ते ६ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण, गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी बरोबरच सॅम - मॅम बालकांचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी एकूण ९५ पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत.


पथक क्रमांक ३२ हे खोलनपाडा (ता. धडगाव) येथील अंगणवाडीत बालकांचा आरोग्य तपासणीसाठी गेले होते. यावेळी पथकाने उपस्थित प्रत्येक बालकाचे वजन, उंची घेऊन कुपोषित श्रेणी काढली, अपेक्षित लाभार्थ्यांचे लसीकरण केले. यादरम्यान तपासणीतएक गंभीर आजाराने त्रस्त बालक आढळून आले. त्या बाळाचे वय एक वर्ष तीन महिने असून सुद्धा त्याचे वजन फक्त ४ किलो होते. त्या बाळाची त्वचा शुष्क व निस्तेज पांडुवर्णी झालेली होती, छातीमध्ये कफ, ताप, श्वास घेताना धापा टाकत होता.एकंदरीत बालकाची प्रकृती लक्षात घेत पथकाने धडगाव ग्रामीण रुग्णालयात नेले.
तिथे बाळाला कुपोषण पुनर्वसन केंद्रात (NRC) भरती करण्यात आले. लागलीच आवश्यक त्या चाचणी करुन उपचार सुरु केले. फिरते पथकामुळे चिंताजनक परिस्थिती असलेल्या एका १५ महिन्यांचा बाळाला योग्यवेळी उपचार मिळालेत. पथकात डॉ. सुनिल लोखंडे, अधिपरिचरिका गीता पावरा, तालुका समन्वयक जगदीश कोळी, औषध निर्माण अधिकारी कमलेश बिरारे यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT