Adv. Yashomati Thakur
Adv. Yashomati Thakur 
उत्तर महाराष्ट्र

कुपोषण कमी करण्यासाठी स्थानिक भाषेतून जनजागृती करा-ॲड.ठाकूर

सकाळ डिजिटल टीम



नंदुरबार : जिल्ह्यातील कुपोषणाचे (Malnutrition) प्रमाण कमी करण्यासाठी आणि बालवयात होणारे विवाह (Child marriage) रोखण्यासाठी स्थानिक बोलीभाषेत जनजागृती करावी, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (State Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakur) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, विनायकराव देशमुख आदी उपस्थित होते.
ॲड. ठाकूर म्हणाल्या, की कुपोषण कमी करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. नवजात अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी मातांच्या पोषणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य व बालकांच्या पोषणाबाबत माहिती द्यावी. बालकांचा आहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. दुर्गम भागात अंगणवाड्याची संख्या वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाई करावी. सर्व शासकीय कार्यालयांत विशाखा समित्यांची स्थापना करावी. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने महिला व बालभवन उभारावे. कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना वात्सल्य योजनेचा लाभ देण्यात यावा. कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.


पालकमंत्री पाडवी म्हणाले, की दुर्गम भागातील घरे विखुरलेली असल्याने अंगणवाड्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आदिवासी भागातील कुपोषण दूर करण्यासाठी व पारंपरिक गैरसमजुती दूर करण्यासाठी जिल्ह्यात प्रयत्न करण्यात येत असून, लवकरच याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या ‘एक जिल्हा- एक उत्पादन’ योजनेंतर्गत भगर पिकाची निवड करण्यात आली असून, भगरीपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे.

दुर्गम भागातील अंगणवाडी बांधकामासाठी डोंगराळ भागातील वाहतूक लक्षात घेता बांधकामासाठी अधिकच्या खर्चाला मंजुरी देणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी खत्री यांनी सांगितले. त्यांनी जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नंदुरबार येथील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची सूचनाही महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर यांनी केली. त्यांच्या हस्ते चिमलखेडीसारख्या दुर्गम भागात कोविड काळातही प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या रेलू वसावे यांचा सत्कार झाला. बैठकीस निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मैनक घोष, मीनल करनवाल, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी आणि
महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पी सी चाको यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती

Mr and Mrs Mahi Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'मिस्टर अँड मिसेस माही'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली एवढी कमाई

Makeup Tips For Summer : घामामुळे चेहऱ्याचा मेकअप बिघडतोय? मग, अशा पद्धतीने करा तयारी, लूक दिसेल एकदम भारी.!

Shubman Gill Wedding : सारा नाही तर 'या' अभिनेत्रीसोबत लग्न करणार करणार शुभमन गिल? चर्चेवर अभिनेत्रीनं सोडलं मौन

Sourav Ganguly: 'विराट महान खेळाडू, पण...', गांगुलीचा टी20 वर्ल्ड कपसाठी कोहलीला मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT