rinki pavra
rinki pavra 
उत्तर महाराष्ट्र

सातपुडा एक्‍सप्रेस रिंकी @ 10.5...पटकाविले पदक

सुनील सूर्यवंशी

तळोदा : जिद्द, चिकाटी व अथक श्रमाची तयारी असली तर संधी वाट पाहते. ती मिळाली तर संधीचे सोने करण्याची धमक पाहिजे. ती धमक सातपुड्याच्या कुशीतील खर्डी (ता. धडगाव) येथील रिंकी पावरा या दहावीच्या विद्यार्थिनीमध्ये असल्याचे तिने सिद्ध करून दाखविले आहे. आसाम येथील गुवाहाटी येथे झालेला फिट इंडिया स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत कास्यंपदक पटकावले आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून अग्रभागी असणारी रिंकू पायाच्या वेदना वाढल्यामुळे शेवटच्या टप्प्यात मागे पडली त्यामुळे तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. अन्यथा ती सातपुड्याची सुवर्ण कन्या ठरली असती. 

सिंगापूर स्पर्धेची संधी हुकली 
नाशिक येथील प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी तिला आपल्या अकादमीत प्रशिक्षणाची संधी दिली. गतवर्षी तिची सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली होती मात्र पासपोर्ट न मिळाल्यामुळे तिला या स्पर्धेतून बाहेर राहावे लागले होते. मात्र रिंग्टने पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. 

परिस्थिती सामना 
रिंकी पावरा ही खर्डी येथील धन्या परश्या पावरा यांची कन्या आहे. तिला तीन भाऊ , तीन बहीण आहेत. तीन एकर शेतीत धन्या पावरा कुटुंब चालवतात. एक भाऊ मोलगी येथे वन संरक्षक आहे. खर्डी हे फक्त ७८६ लोकसंख्येचे गाव आहे.रिंकीचे प्राथमिक शिक्षण पहिली ते दहावीपावेतो राजबर्डी येथील शासकीय आश्रमशाळेत घेत आहे 

क्रीडाक्षेत्राची आवड 
रिंकीला अगोदरपासून खेळात आवड होती. विविध क्रीडा स्पर्धेत ती सहभागी होत असे. अभ्यासात देखील देखील हुशार असून तिचा अंगी गुण आहेत. दोन वर्षापूर्वी झेलसिंग पावरा यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.त्यात ३०० मीटरमध्ये प्रथम आली होती. नंतर नंदुरबार इथे चमक दाखवली. झेलसिंग पावरा यांनी कविता राऊत यांचे उदाहरण देऊन मार्गदर्शन केले .नाशिक- धुळे , नंदुरबार, सातारा, रत्नागिरी, पंजाब, आसाम या ठिकाणी स्पर्धेत तिने सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती तिचा शाळेचे मुख्याध्यापक के.एन. पटेल यांनी सकाळ शी बोलतांना दिली. 

कविता राऊतांची प्रेरणा 
मुंगबारी (ता.धडगाव) येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुर्गम भागातील खेळाडूंना प्रेरणा मिळावी व त्यांना कुठेतरी ग्रीप मिळावी हा उद्देश होता. त्यासाठी भारताची प्रसिद्ध धावपटू नाशिक येथील कविता राऊत यांना आमंत्रित केले होते. या स्पर्धेत रिंकी ने अतिशय उत्तम असे प्रदर्शन केल्यानंतर भोसला मिलिटरी स्कूल नाशिक या ठिकाणी तिला पुढील क्रीडा मार्गदर्शनासाठी पाठवण्यात आले होते. 

सातपुड्यातील हिरे शोधण्याची गरज 
धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, नंदुरबार जिल्ह्यात असे अनेक गुणवंत खेळाडू हिरे आहेत मात्र त्यांना शोधून त्यांना चमकवणे हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व क्रीडा विभागाचे काम असून याकडे लक्ष वेधावे हा माझा त्यामागचा उद्देश होता. म्हणून २०१६ मध्ये कविता राऊत यांना आमंत्रित करून स्पर्धा घेतल्या होत्या. येणाऱ्या काळात अशाच पद्धतीचे दुर्गम भागातील दुर्लक्षित खेळाडूंना विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून शोधून काढण्याची मोहीम प्रशासनाने हाती घ्यावी ,अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे 
झेलसिंग पावरा, निवृत्त अभियंता शहादा 

वेळेतील फरक 
। झारखंड ची खेळाडू सुप्रीती कश्यप १०, २ सेकंद 
गुजरात ची दृष्टीबेंन प्रवीण भाई १० ,४'७६ सेकंद 
रिंकी १० ,५'३३ सेकं 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT