Rshi ship
Rshi ship Rshi ship
उत्तर महाराष्ट्र

दैव बलवत्तर म्हणूनच ‘तौक्ते’ चक्रीवादळातून सुखरूप परतलो !

धनराज माळी

नंदुरबार : गेल्या आठवड्यात थैमान घातलेल्या तौक्ते चक्रीवादळात ( Tocte storm) समुद्रात (sea)अडकलेल्या ‘राशी’ या जहाजावरील (Ship) नंदुरबारचे सुपुत्र राहुल पाठक यांनी सुमारे २८ तास वादळाचा थरार अनुभवला. सहकाऱ्यांच्या मदतीने तांत्रिक अडचणी दूर करीत जहाजाचे इंजिन बंद पडू दिले नाही. त्यामुळे सर्व २३ जण सुखरूप परतलो. समोर साक्षात मृत्यू (Death) दिसत असतानाही धाडस, मुखातून सुरू असलेली गणपती बाप्पाची आराधना व दैव बलवत्तर होते, म्हणूनच आमची ‘नौका’ सुखरूप किनाऱ्याला लागली व सुटकेचा निःश्‍वास सोडला, असे स्वनुभव श्री. पाठक यांनी बोलताना कथन केले.

(ship engineer's twenty-eight-hour thunderstorm experience)

राहुल बी. ई. मेकॅनिकल असून, २० वर्षांपासून मरिन लाइन्समध्ये कार्यरत आहेत. सध्या ते मित्सुई या जपानच्या (japan) कंपनीत मुख्य अभियंता (ship engineer)आहेत. गेल्या आठवड्यात भारताच्या किनारपट्टीवर ‘तौक्ते’ या महाभयानक वादळाने थैमान घातले. १९ मेस ते बाँबे हाय येथे १२० नॉटीकल माईल म्हणजेच किनाऱ्यापासून सुमारे २०० किलोमीटरवर अरबी समुद्रात जहाजात होते. सध्या सुटीवर घरी आले असल्याने त्यांची भेट घेत त्यांच्याशी बातचित केली.

‘तौक्ते’चा संदेश मिळाला
या वेळी श्री. पाठक म्हणाले, की सकाळी ५.४०च्या सुमारास त्यांच्या कॅप्टनला ‘तौक्ते’ वादळाचा उपग्रहावरून संदेश मिळाला. सुरवातीला वादळाचे गांभीर्य समजले नाही. सकाळी १०.४० च्या सुमारास वादळाची दिशा दिव, दमण, कच्छ या ताप्ती फिल्डकडे होती. मात्र, १२.४० पर्यंत या वादळाने पुन्हा दिशा बदलून बाँबे हायकडे आगेकूच केली. या वेळी वादळाचा वेग ४० ते ४५ किमी प्रतितास होता. परंतु दुपारी दोनच्या सुमारास हा वेग तब्बल १२० किमी प्रतितास झाला. या वेळी जवळपास ११० जहाज समुद्रात होती. ‘तौक्ते’ वादळाची भयानकता एवढी होती की जहाज २१ अंशापर्यंत दोन्ही बाजूंना झुकत होते. वादळामुळे जहाज अधिकच हेलकावे खात होते. काही कर्मचारी प्रथमच जहाजात आले होते. त्यांना या परिस्थितीची अजिबातच जाणीव नव्हती. त्यातच १५-१६ कर्मचाऱ्यांना उलट्यांचा त्रास झाला. अनेक जण चक्कर येऊन पडले.

इंजिन बंद पडू दिले नाही

अनेकांच्या पोटातील पाणी कमी झाल्याने ते आजारी पडले. सहा ते सात जणांवरच जहाजाची मदार होती. त्यातच किचनमधील डाळ, तांदूळ, तेल, मसाले, भाजीपाला सर्वच खाली पडून एकमेकांत मिसळले, त्यात ऑइल पडल्याने सर्वच सामग्री खराब झाली. फक्त तयार वरण-भात, भाजी- पोळी एवढेच शाबूत होते. ड्यूटी दुपारी बारा ते सहा व रात्री बारा ते सहा अशी असते. परंतु, सोबतच्या कर्मचाऱ्यांची तब्येत खराब झाल्यामुळे पुढची सूत्रे सांभाळावी लागली. जहाज जोरजोराने दोन्ही बाजूंना हेलकावे खात होते. त्यामुळे डिझेलच्या टाकीतील कचरा फिल्टरमध्ये साचत होता. इंजिन बंद पडण्याची शक्यता होती. इंजिन बंद पडले असते, तर जहाजावर नियंत्रण मिळवणे शक्य नव्हते. जहाज काही मिनिटांतच बुडाले असते.

२८ तासांनंतर सुखरू..

त्यातल्या त्यात पी ३०५ हे जहाज समुद्रात बुडाले, ते या जहाजापासून अवघ्या ५० किलोमीटरवर होते. त्या जहाजाला वाचविण्यात मदत करण्याच्या सूचनाही राशी जहाजच्या कॅप्टनला मिळाल्या होत्या. परंतु, त्यांचीच परिस्थिती अत्यंत खराब होती. समोर साक्षात्‌ मृत्यू दिसत असताना हिमतीने फिल्टर बदलण्याचे काम वेळोवेळी करावे लागत होते. जिवावर उदार होऊन काम पूर्ण केले. साधरण २८ तासांनंतर सुखरूपस्थळी आलो. दैव बलवत्तर होते. जहाजातील गणपती मूर्तीकडे पाहून नामस्मरण सुरू होते. त्यातच कुटुंबीयांशी संपर्क करून परिस्थितीची माहिती देत होतो. त्यांच्याकडूनही दिलासा अन्‌ धीर मिळत होता, असेही पाठक यांनी या वेळी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT