lingana fort lingana fort
उत्तर महाराष्ट्र

३१०० फुट उंचीचा लिंगाणा किल्ला सर; दहिंदुलेच्या तरुणाची कामगिरी

३१०० फुट उंचीचा लिंगाणा किल्ला सर; दहिंदुलेच्या तरुणाची कामगिरी

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : दहिंदुले (ता. नंदुरबार) येथील ईश्वर अशोक साळुंखे हा तरुण मागील ४ वर्षापासून पुणे येथे शिक्षणासाठी राहत आहे. ३० मेस त्याने महाड तालुक्यातील (जि. रायगड) दापोली जवळील ३१०० फ़ूट उंचीचा आणि चढाईसाठी अतिशय कठीण व अवघड असणारा (lingana fort mahad) लिंगाणा डोंगरी किल्ला सर केला. (nandurbar-young-man-ishwar-salunkhe-lingana-fort-climb)

पुण्याहून १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंगाणा किल्याच्या दोन्ही बाजुला खोल दरी आहेत आणि अश्या या अभेद्य सह्याद्रीच्या डोंगर चढाई करताना खूप कठीण असा संघर्ष करावा लागला. मोहरी गावापासून साधारणतः दोन तास जंगलातून पायपीट करुन बोऱ्याट्याची दगड धोंड्यांनी खच्चून भरलेली नाळ आणि अशा नाळीतून त्याला रस्ता काढत शेवटी तो गडाचा पायथ्याशी पोहचला. त्यानंतर सुरु होती ती चढाईची परीक्षा.

दोरीच्या सहाय्याने चढाई

किल्ल्याचा तीन हजार फूट उंचीचा तो बेलाग सुळका आणि त्यांची ती निसरडी माती त्यांना पार करण्यासाठी जीवाचे प्रयत्न करावे लागले. दोरीच्या साहाय्याने त्यांनी चढाईला सुरवात केली. नजरेत फक्त ठेवला तो किल्ल्याचा बेलाग सुळका आणि एक-एक पाऊल करत किल्याचा अर्धा टप्पा पार पाडला. अर्ध्या टप्प्यावर किल्यावर स्वराज्याचे कैदगृह होते. त्या सर्व कैदी तुरुंगाची माहिती गोळा करत तो पुढच्या टप्प्यासाठी सज्ज झाला. सलग दोन तासांच्या चढाईनंतर किल्ल्याचा तो बेलाग सुळकाचे शिखर गाठले. शिखरावर पोहचल्यानंतर ते सह्याद्रीचे सौंदर्य पाहुन डोळ्यांचे पारणे फिटले. आणि त्यात भर घातली ती डोंगराच्या पल्याड मावळतानाच्या त्या सुर्याने. काय ते नयनरम्य दृश्य होते.

भगवा फडकवून आनंद

तीन हजार फ़ुट उंचीवर आपल्या स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावुन या अप्रतिम क्षणाचा आनंद त्याने घेतला. त्याच्या संघात संघप्रमुख सोमनाथ शिंदे (तुळजापूर), रामदास धरपाळे (हडपसर), संघातील सदस्य सचिन चौधरी (राजगुरु नगर), सागर पाटील (लाहोरा, शहादा), सुयोग जाधव (पुणे), अजय मोळक (पुणे) यांचा समावेश होता. हे यशाचे शिखर पादाक्रांत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal: "तानाजी सावंतला मध्ये का घेतोस? मी घरी येतो नाहीतर.." गुंड निलेश घायवळचा धमकीवजा फोन कॉल

Drishyam 3 : आता येतोय दृश्यम 3 ! अजय देवगण 'या' तारखेला करणार सिनेमाची घोषणा

Nagpur Crime: नागपूर हादरलं! गरोदर महिलेचा खून करुन रस्त्याच्या कडेला फेकलं; 'अशी' उघडकीस आली घटना

Viral: मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्याचे लाजिरवाणे कृत्य, रुग्णाला बिस्कीट दिले, फोटो काढला अन् परत घेतले, पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: गरोदर महिलेचा खून करून फेकले रस्त्याचा कडेला, दुर्गंधी सुटल्याने घटना आली समोर..

SCROLL FOR NEXT