उत्तर महाराष्ट्र

लसीकरण जनजागृतीसाठी स्‍वखर्चातून शिक्षकाने उभारला संदेश रथ

गावातील प्रत्येक घरात प्रचाराचे नियोजन करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरित करत आहेत

सकाळ वृत्तसेवा

शहादा : दोंडवाडा (ता. पानसेमल) येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शाळेचे शिक्षक (Elementary school teacher) भारतसिंह वाघ (राजपूत) यांनी कोरोना (corona) प्रतिबंधक लस जनजागृतीसाठी (Vaccinaion Awareness) स्वतःचे वाहन सजवले असून, या संदेश रथाचे प्रांताधिकारी सुमेरसिंग मुजाल्दा यांनी हिरवा झेंडा दाखवत जनजागृती कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले.(zilla parishad techer vaccinaion awareness)

पानसेमल पालिकेचे मुख्याधिकारी शिवजी आर्य, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद किराडे, तालुका शिक्षणाधिकारी द्वारिका आर्य, गटशिक्षणाधिकारी संतोष पवार, शिक्षिका रश्मी शुक्ला, शीतल भिलावे, सुनीता पटेल, शिक्षक संजय पवार आदी उपस्थित होते.

गावागावात जनजागृती

दोंडवाडा शाळेतील शिक्षक भारतसिंह वाघ (राजपूत) यांनी स्वखर्चाने व निःस्वार्थ सेवाभावाने लसीकरण जनजागृतीसाठी संदेश रथाद्वारे प्रत्‍येक गावात व गावातील प्रत्येक घरात प्रचाराचे नियोजन करून नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरित करत आहेत. तसेच, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, कोणते नियम पाळावेत यांची माहिती या संदेश रथाद्वारे देत आहेत. कोविड-१९ आजाराबाबतची माहिती देताना नागरिकांना मास्‍कचे वितरणही करण्‍यात येत आहे.


विशेषतः मास्‍क योग्यरीत्या लावणे, हातांची नियमितपणे स्‍वच्‍छता राखणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन अत्‍यावश्‍यक आहे. अशा सूचना ध्वनिक्षेपणावरून दिल्या जात आहेत. संदेश रथ ज्या-ज्या गावांमध्ये गेला त्या-त्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.
- भारतसिंह वाघ, जि. प. शिक्षक, दोंडवाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi press conference: राहुल गांधींनी दाखवले पोलिसांच्या क्रूरतेचे धक्कादायक फोटो; अमित शाहांचं नाव घेत केला गंभीर आरोप

Live Marathi News Update : कर्नाटक काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी कर्नाटक भवन सोडले

Pune Investment Scam: शेअर मार्केट व ऑनलाइन टास्कच्या आमिषाला चौघे बळी; पुण्यात ४६ लाखांची सायबर फसवणूक

Pune Gurupurnima Celebration: पुण्यात गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्सव; मंदिरांपासून शैक्षणिक संस्थांपर्यंत गुरु-शिष्य परंपरेचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi कडे थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी! BCCI च्या प्रमुख स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वात खेळणार

SCROLL FOR NEXT