उत्तर महाराष्ट्र

आदिवासी आश्रमशाळांमध्ये अनलॉक लर्निंग उपक्रम

प्रदीप पाटील

नवलनगर: आदिवासी विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या आश्रम शाळेमध्ये शाळा बंद पण शिक्षण चालू या घोषणेला अनुसरून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी शैक्षणिक किट, कार्यपुस्तिका व कृती पुस्तिका देण्यात येणार आहेत. यासाठी 28 कोटी 59 लक्ष 56 हजार चारशे रुपयांची अंदाजीत खर्चास शासन स्तरावर नुकतीच मान्यता देण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा निवासी असल्यामुळे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर त्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी विकास विभागामार्फत अनलॉक लर्निंग चा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तालयामार्फत अनलॉक लर्निंग हा पर्याय शिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे. समितीतील तज्ञ अभ्यासकांनी नियोजन आराखडा तयार केला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या सत्रात शिक्षण पर्यायी व्यवस्था द्वारे सुरु ठेवण्याचे अनुषंगाने विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याऐवजी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. 

शैक्षणिक साहित्य साठी प्रती विद्यार्थी 600रु. प्रति विद्यार्थी शैक्षणिक कीट साठी पाचशे रु.,कार्यपुस्तिका साठ रु.,कृतिपुस्तिका तीस रुपये व अनुषंगिक खर्च दहा रु.असा एकूण सहाशे रुपये प्रति विद्यार्थी खर्च गृहीत धरण्यात आला आहे .शासकीय आश्रम शाळा एकूण 499 असुन 183546एकुण विद्यार्थी आहेत. .अनुदानित आश्रम शाळा 539 असून तेथील विद्यार्थी संख्या 234422आहे .नामांकित आश्रम शाळा 171 असून तेथील विद्यार्थी संख्या 53626 आहे .एकलव्य आश्रम शाळा 25 असून तेथील विद्यार्थी संख्या 5000 आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Police Commemoration Day : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पुण्यात हुतात्म्यांना आदरांजली, उपमुख्यमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र

अहान पांडे-शर्वरी वाघच्या चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये, अ‍ॅक्शन आणि रोमांसचा परिपूर्ण संगम

Fake Medicine : औषध भेसळ प्रकरण; दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी, विक्रेत्यांना त्रास नको

Mira Road Clash : मीरारोडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २० रिक्षांची केली तोडफोड, मुलीच्या छेडछाडीवरून झाला वाद

SCROLL FOR NEXT