bee attack 
उत्तर महाराष्ट्र

मधमाशांनी रोखला अंत्यविधी...शेवटी बोलाविले जेसीबी

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : मोठे कडवान (ता. नवापूर) येथे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या लोकांवर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास शंभरावर लोक जखमी झाले. या मधमाशांनी ग्रामस्थांचा थेट गावापर्यत पाठलाग केला, दरम्यान दफनविधी जेसीबीच्या मदतीने कसाबसा उरकण्यात आला. 

मोठे कडवान येथील लक्ष्मीबाई सखाराम वळवी (वय ५९) यांचे निधन झाले होते. काल (ता.२४) दुपारी बाराच्या सुमारास ग्रामस्थ स्मशानभूमीत आले असता तेथील मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यापासून बचावासाठी ग्रामस्थांनी मृतदेह प्रेत जागेवर ठेवत सैरावैरा पळ काढला. मधमाशांनी गावापर्यंत लोकांचा पाठलाग करून त्यांना जखमी केले. मधमाशांचे हे रौद्ररूप आणि आक्रमकता पाहून सर्वच घाबरले. यात काही महिलांही दुखापतग्रस्त झाल्या. सरपंच बंधू पाच्‍या वळवी यांनी १०८ या रुग्णवाहिकेला बोलवत जखमींना खांडबारा व नवापूर येथील विसरवाडी, खांडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या काळात काहींनी वैयक्तिक वाहनाद्वारे जखमींना शासकीय व खासगी रुग्णालयात दाखल केले. मधमाशांच्या पोळ्याला कुणीतरी धक्का लागल्याने मधमाशा चवताळल्याचा अंदाज आहे. 
 
जेसीबीने केला दफनविधी 
मधमाशांच्या हल्ल्यानंतर सारेच जीव घेत पळत सुटल्याने लक्ष्मीबाई वळवी यांचा मृतदेह दुपारी बारापासून स्मशानभूमीतच पडून होता. काही ग्रामस्थांनी दफनविधीसाठी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र मधमाशा लोकांना जवळपासही फिरकू देत नव्हत्या. दफनविधीच्या प्रयत्नात दुपारचे तीन वाजले. दफनविधी करणे आवश्यक होतं म्हणून सरपंच बंधू वळवी यांनी खांडबारा येथून जेसीबी मागवून घेतला. अखेर त्याच्या मदतीने दफन करण्यात आले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT